'हिंदी राष्ट्रीय भाषा आहे, गुगल करा' दाबोळी विमानतळावर तामिळनाडूची महिला आणि CISF कर्मचाऱ्यात भाषेवरुन वाद

CISF कर्मचाऱ्याचे वागणे अतिशय अमानवीय आणि असंवेदनशील होते असे महिला म्हणाली.
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

Dabolim Airport: गोव्यात सुट्टीचा आनंद घेतल्या आपल्या गावी परतणाऱ्या तामिळनाडूच्या पर्यटक महिलेला दाबोळी विमानतळावर विचित्र अनुभव आला. विमानतळवर महिलेला CISF कर्मचाऱ्याने हिंदी भाषा शिकण्याचा सल्ला दिला. एवढेच नव्हे तर हिंदी राष्ट्रीय भाषा असल्याचे देखील त्याने महिलेला सांगितले.

शर्मिला राजशेखर (वय 34, रा. चेन्नई) असे या महिलेचे नाव असून, त्या व्यवसायाने अभियंता आहेत. शर्मिला यांनी दाबोळी विमानतळावर त्यांना आलेल्या अनुभवाचे कथन केले.

विमानतळवर हिंदी भाषा समजत नसल्याचे त्यांनी CISF कर्मचाऱ्याला सांगितले, तर कर्मचाऱ्याने हिंदी राष्ट्रीय भाषा असून गुगल करुन तपासून पाहा असेही या कर्मचाऱ्याने महिलेला सांगितले.

चेन्नईला जाणाऱ्या फ्लाईटसाठी शर्मिला सुरक्षा तपासणीसाठी रांगेत उभ्या होत्या, CISF कर्मचाऱ्याने महिलेला दुसरा ट्रे घेण्याची विनंती पण हिंदी भाषेत बोलल्याने त्यांना ते समजले नाही.

महिलेने त्या तामिळनाडू येथील आहेत व त्यांना हिंदी समजत नसल्याचे सांगितले. त्यावर CISF कर्मचाऱ्याने त्यांना हिंदी राष्ट्रीय भाषा असून, भाषा शिकण्याचा सल्ला दिला.

महिलेने मात्र तिची बाजू मांडत हिंदी अधिकृत भाषा असून, राष्ट्रभाषा नाही गुगल करुन CISF कर्मचाऱ्याला दाखवले.

विमानतळावर महिलेसोबत तीन वर्षांची लहान मुलगी होती, CISF कर्मचाऱ्याचे वागणे अतिशय अमानवीय आणि असंवेदनशील होते असे महिला म्हणाली.

दरम्यान, महिलेने फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी सीआयएसएफ पर्यवेक्षकाकडे तोंडी तक्रार दाखल केली. घडलेल्या प्रकाराबद्दल अधिकाऱ्याने माफी मागितली. तसेच, विमानतळाच्या तक्रार अधिकाऱ्यांकडे ई-मेलद्वारे तक्रारही दाखल केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com