Ganesh Decoration Competition
Ganesh Decoration Competition Dainik Gomantak
गोवा

Ganesh Decoration Competition: ‘गोमन्‍तक’च्‍या गणेश सजावट स्पर्धेत ताळू पाडकर प्रथम

दैनिक गोमन्तक

Ganesh Decoration Competition: दै. ‘गोमन्तक’ व ‘रुद्रेश्‍वर पणजी’ या संस्थेने आपली सामाजिक बांधीलकी जपत गणेश चतुर्थीच्‍या काळात पर्यावरणपूरक अखिल गोवा घरगुती गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज बुधवारी येथील ‘गोमन्तक भवन’ येथे पार पडला.

स्पर्धेच्या प्रथम पारितोषिकाचे मानकरी ताळू पाडकर ठरले. विजेत्‍यांना रोख बक्षिसे, चषक आणि प्रशस्‍तिपत्रके देण्‍यात आली.

या सोहळ्याला ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक, रुद्रेश्‍वर पणजीचे अध्यक्ष योगेश कापडी, धीरज धारगळकर तसेच ‘गोमन्तक’चे मुख्‍य व्‍यवस्‍थापक (प्रशासन व्‍यवसाय) सचिन पोवार, वितरण व्यवस्थापक अरुण पाटील, साहाय्‍यक वितरण व्यवस्थापक भारत पोवार व अन्‍य मान्यवर उपस्थित होते.

राजू नायक म्हणाले, चतुर्थी हा सण प्रामुख्याने पर्यावरणपूजक सण आहे. पर्यावरणातील पाणी, फुले, वेली आणि शाडू मातीच्या गणेशमुर्तीद्वारे हा उत्सव साजरा केला जातो. पंरतु अलीकडच्या काळात सजावटीसाठी प्लास्‍टिक व थर्मोकोलचा वापर केला जात आहे, जो पर्यावरणाच्या दृष्‍टीने घातक आहे.

राज्यातील पर्यावरण दिवसेंदिवस दूषित होत आहे. ८० टक्के नद्या प्रदूषित झाल्या आहेत. याबाबत राज्य सरकाराकडे बोट दाखवितानाच या राज्याचे नागरिक म्हणून आमची देखील पर्यावरण संवर्धनाची बांधिलकी आहे, याची जाण ठेवून आपले सण-उत्सव पर्यावरणपूरक साजरे करणे गरजेचे आहे, असेही ते म्‍हणाले.

‘रुद्रेश्‍वर पणजी’चे अध्यक्ष योगेश कापडी म्हणाले, चतुर्थी हा गोव्यातील महत्त्वाचा व परिवाराला एकत्र आणणारा सण. या सणांमुळेच कलात्मक कौशल्य प्राप्त होत असते. सुरूवातीला प्रर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून सजावट केली जायची. परंतु अलीकडे पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्‍टिक व थर्मोकॉलचा वापर केला जात आहे. प्रत्येकाने पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे.

स्पर्धेतील विजेते स्‍पर्धक

प्रथम : तोळू पाडकर (इंद्रवाडा, गावडोंगरी-काणकोण), द्वितीय : शुभम मयेकर (चिंचोळे-ताळगाव), तृतीय : संदेश भोमकर (जुने गोवे). उत्तेजनार्थ : प्रथम : सिद्धांत मडकईकर (सोनारभाट-तिसवाडी), द्वितीय : धीरज तारी (चिंचोळे-ताळगाव), तृतीय : विष्णू फडते (गावकरवाडा- बेतकी), चतुर्थ : गौरांग नाईक (बेभकेगाळ-कुडचडे), पंचम : दर्शन देसाई (वेरोडा-कुंक्कळी). दरम्‍यान, स्पर्धेचे परीक्षक म्‍हणून कुणाल धारगळकर, योगेश कापडी, संजय हंद्राळे व मनस्विनी प्रभुणे नायक यांनी काम पाहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT