Taleigao Panchayat Gramsabha Dainik Gomantak
गोवा

Taleigao Gramsabha Meeting : ‘तो’ बांधकाम परवाना मागे घ्या! ताळगाव ग्रामसभेत काही ग्रामस्थांची हुल्लडबाजी; पाणीप्रश्नाकडे वेधले लक्ष

Taleigao Villagers Protest Construction Project Amid Water Issue: ताळगाव पंचायत क्षेत्रात गेल्या काही वर्षात टोलेगंज बांधकामे उभी राहिली आहेत, मात्र या भागात होणारा पाणी पुरवठ्याची क्षमता जुनीच आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या गेल्या २ - ३ वर्षापासून भेडसावत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News: ताळगाव पंचायत क्षेत्रात गेल्या काही वर्षात टोलेगंज बांधकामे उभी राहिली आहेत, मात्र या भागात होणारा पाणी पुरवठ्याची क्षमता जुनीच आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या गेल्या २ - ३ वर्षापासून भेडसावत आहे.

नव्या बांधकामासाठी रस्तेही अरुंद आहेत. पंचायतीने या बांधकामांना परवानगी देण्यापूर्वी या भागात असलेल्या साधनसुविधांचा नियोजन आराखडा तयार करावा. हा आराखडा तयार होईपर्यंत नव्या बांधकामांना परवानगी दिली जाऊ नये, अशी जोरदार मागणी आज ताळगाव ग्रामसभेत केली. मात्र, यावेळी उपस्थित असलेल्या काही ग्रामस्थांनी हुल्लडबाजी करत प्रश्‍न मांडण्यास ग्रामस्थांना अडचणी उपस्थित केल्या.

‘तो’बांधकाम परवाना मागे घ्या !

पंचायत भागातील सांडपाणी जोडणीचे काम अनेक वर्षे झालेले नाही. अनेक इमारतींच्या सांडपाणी टाक्यामधून घाणपाणी वाहून ते शेतजमिनीत घुसले आहे. मरड - ताळगाव येथे शेतीच्या मधोमध एका बांधकामाला परवानगी दिली आहे.

या बांधकामाकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. हे बांधकाम झाल्यास शेतीत सांडपाणी टाक्यांचे पाणी घुसणार आहे. त्यामुळे या इमारतीचा बांधकाम परवाना मागे घ्यावा, अशी मागणी शेतकरी सिझर माशेदो यांनी केली. त्याला ॲड. पुंडलिक रायकर तसेच झेव्हियर आल्मेदा यांनीही पाठिंबा दिला.

कोंडवाड्यासाठी निविदा

पंचायत क्षेत्रात भटक्या गुरांना पकडण्याचे काम सुरू झाले होते व त्यासाठी कर्मचारीही नेमले होते. मात्र, गुरांच्या मालकांनी या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने हे काम अर्ध्यावरच बंद पडले.. कोंडवाड्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती पंचायत सदस्य जानू रोझारिओ यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT