Taleigao Panchayat Election  Dainik Gomantak
गोवा

Taleigao Panchayat Election : तिघांची माघार; चौघे बिनविरोध, सात वॉर्डमध्ये दुहेरी लढत

Taleigao Panchayat Election : वॉर्ड क्रमांक १ मधील मयूर उस्कैकर हे काल रात्री आई व बहिणीसह गायब होते, त्यामुळे या वॉर्डमध्ये खळबळ उडाली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, ताळगाव पंचायत निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तिघांनी माघार घेतली.

त्यामुळे आमदार बाबूश - जेनिफर मोन्सेरात गटाच्या ‘ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंट’च्या बिनविरोध निवडून आलेल्यांची संख्या चार झाली, परंतु उर्वरित सात वॉर्डमध्ये फ्रंटकडून बिनविरोध करण्याचे प्रयत्न असफल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या वॉर्डमध्ये फ्रंटच्या सात उमेदवारांसमोर सात अपक्ष उमेदवार राहिल्याने ही लढत दुहेरी होणार हे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे आमदार बाबूश - जेनिफर मोन्सेरात गटाच्या ‘ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंट’च्या बिनविरोध निवडून आलेल्यांची संख्या चार झाली, परंतु उर्वरित सात वॉर्डमध्ये फ्रंटकडून बिनविरोध करण्याचे प्रयत्न असफल झाल्याचे दिसून आले.

त्यामुळे या वॉर्डमध्ये फ्रंटच्या सात उमेदवारांसमोर सात अपक्ष उमेदवार राहिल्याने ही लढत दुहेरी होणार हे स्पष्ट झाले आहे.

वॉर्ड क्रमांक १ मधील मयूर उस्कैकर हे काल रात्री आई व बहिणीसह गायब होते, त्यामुळे या वॉर्डमध्ये खळबळ उडाली होती.

आज त्यांनी अर्ज मागे घेतल्याने वॉर्ड १ मधून सिद्धी राजेंद्र केरकर (बोरभाट), वॉर्ड सहामधून प्रतिमा शिरोडकर यांनी माघार घेतल्याने इस्टेला डिसोझा, तर वॉर्ड ११ मधून डायस यांनी माघार घेतल्याने सिडनी बिनविरोध निवडून आले, तर वॉर्ड क्रमांक १० मध्ये सागर बांदेकर यांचाच एकमेव अर्ज होता, त्यामुळे ते यापूर्वीच बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले होते.

अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना बोलावून मामलेदार लक्ष्मीकांत देसाई यांनी पंचायत निवडणुकीविषयीची आचारसंहिता व नियमावली समजावून सांगितली.

७ प्रभागांतील १७ केंद्रावर मतदान

अकरा वॉर्डसाठी १९ हजार ३४९ मतदार मतदान करणार होते. त्यात ९ हजार २०६ पुरुष आणि १० हजार १४३ महिला मतदारांचा समावेश होता.

त्यासाठी २६ मतदान केंद्रावर मतदान घेतले गेले असते, परंतु आता अकरापैकी चार वॉर्डमधील उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने सात वॉर्डमध्ये १७ केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे ११ हजार ९८८ मतदार मतदान करतील. त्यात ५ हजार ६९० पुरुष, तर ६ हजार २९८ महिला मतदरांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT