Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: ताळगावातून 16 वर्षीय मुलीचे अपहरण, संशयिताला मुलीसह त्रिपुरा येथे घेतले ताब्यात; पणजी पोलिसांची कारवाई

Taleigao Girl Kidnapping Case: संशयित दास याच्या ट्रान्झिट वॉरंटसाठी अर्ज केला असता त्याला त्रिपुरा न्यायालयाने जामीन दिला. त्याच्याविरुद्ध अपहरणासह पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला जाणार.

Sameer Panditrao

पणजी: व्हडलेभाट - ताळगाव येथील १६ वर्षीय मुलीचे अपरहण करून पलायन केलेल्या बिपलाब दास याला पणजी पोलिसांनी त्रिपुरा येथे मुलीसह ताब्यात घेतले.

संशयित दास याच्या ट्रान्झिट वॉरंटसाठी अर्ज केला असता त्याला त्रिपुरा न्यायालयाने जामीन दिला. त्याच्याविरुद्ध अपहरणासह पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला जाणार असून पुन्हा अटक केली जाणार असल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली. पीडित मुलीचे कुटुंब व संशयित दास हे शेजारी आहेत. दास याच्यावर मुलीच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला होता.

दास हा मूळचा त्रिपुरा येथील असल्याने पोलिसांनी त्रिपुरा पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, तो त्रिपुरा येथे पोहचला नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक सपना गावस यांनी कुटुंबीयांसह त्रिपुरा गाठले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने दास याच्या घरी पोचले असता मुलगी त्याच्यासोबत सापडली.

मुलीला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले असून संशयिताला अटक करून गोव्यात आणण्यासाठी न्यायालयात ट्रान्झिट वॉरंट घेण्यासाठी अर्ज करण्यात आला. त्याचवेळी संशयिताच्या वतीने जामिनासाठी अर्ज केला असता, तो मान्य करण्यात आला. त्याला पुढील आठवड्यात पणजी पोलिस स्थानकात हजेरी लावण्यास सांगितले आहे. लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT