Canacona Lokotsav | Dainik Gomantak
गोवा

Goa Culture: काणकोणला सांस्कृतिक क्षेत्रात पुढे नेऊ

काणकोण तालुक्याला सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रात पुढे नेण्याचा मानस आहे. त्याकामी सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन सभापती रमेश तवडकर यांनी केले.

दैनिक गोमन्तक

Goa Culture: काणकोण तालुक्याला सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रात पुढे नेण्याचा मानस आहे. त्याकामी सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन सभापती रमेश तवडकर यांनी काणकोण उपजिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजित प्रजासत्ताकदिनी कार्यक्रमात केले.

या कार्यक्रमाला नगराध्यक्ष रमाकांत नाईक, उपनगराध्यक्ष लक्ष्मण पागी, नगरसेवक सायमन रिबेलो, नादीन फर्नांडिस, मामलेदार मनोज कोरगावकर, गटविकास अधिकारी अशोक नाईक, पोलिस उपअधीक्षक संदेश चोडणकर, पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस, अग्निशामक केंद्राचे प्रमुख रवींद्रनाथ पेडणेकर, लोककला अभ्यासक कमलाकर म्हाळशी, स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नी व अन्य सरकारी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सभापतींनी ध्वजारोहण करून मानवंदना स्वीकारली. काणकोण पोलिस पथकाने पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र नाईक यांच्या पुढारपणाखाली मानवंदना दिली. यावेळी एनसीसीच्या पथकाने संचलन केले. त्याशिवाय शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालगडी, श्रद्धानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांच्या जीवनावरील मूकनाट्य सादर केले.

त्याचप्रमाणे मोखर्ड येथील खास मुलांच्या शाळेतील विद्यार्थी, नवोदय विद्यालय, सेंट तेरेजा ऑफ जिझस हायस्कूल तसेच मल्लिकार्जुन विद्यालय व कात्यायनी बाणेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी मामलेदार कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष पै यांनी केले.

काणकोणच्या विकासासाठी चारपदरी रस्त्याची नितांत गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. येत्या सहा महिन्यांत करमल घाटातील चारपदरी रस्त्याचा तिढा सुटणार आहे. बेकारीचा प्रश्न सोडविण्यासाठी कृषी आधारित व प्रदूषण विरहित उद्योग येथे उभारण्यासाठी भविष्यात प्राधान्य देणार आहे.

तालुक्यातील तेरा बेघरांना स्वतःचे घरकूल उभारून देण्यात येईल. त्यासाठी प्रत्येकाने किमान एक रुपया व आपला एक दिवस या कार्यासाठी द्यावा, असे सभापती रमेश तवडकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT