पणजी: गोव्यात निवडणूक प्रचार धूमधडाक्यात सुरु आहे. सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना व सवलती जाहीर करत आहेत. तृणमूल कॉंग्रेसच्या (TMC) 'युवा शक्ती कार्ड' योजनेने अनेक लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत, त्यातच आता आम आदमी पक्षाने (AAP) मतदारांना अजब सल्ला दिला आहे. 'आप'ने एका जाहिरात पत्रकाद्वारे लोकांना इतर पक्षांकडून पैसे घेऊन 'आप'ला मत देण्याचे आवाहन केले आहे.
पत्रकाच्या माध्यमातून आपने मंतदरांना (Voters) सांगितले आहे की, निवडणुकीच्या (Election) आधी, इतर राजकीय पक्ष तुमचे मत विकत घेण्यासाठी पैसे आणि 'भेटवस्तू' वाटतात. त्यांनी दिलेले पैसे आणि भेटवस्तू स्वीकारा. या भ्रष्ट पक्षांनी वर्षानुवर्षे तुम्हाला लुटले आहे. तो तुमचा पैसा आहे. ते तुमचे मत विकत घेण्यासाठी तुमच्याकडे येतात तेव्हा नाही म्हणू नका. पैसे घ्या. पण, तुम्ही फक्त आम आदमी पक्षालाच मतदान केले पाहिजे.
आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) निवडणुकीपूर्वी पैसे देऊ शकत नाही कारण आमचा पक्ष स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. आप सत्तेवर आल्यास लोकांना मोफत वीज मिळेल, कुटुंबातील प्रत्येक महिलेला महिन्याला 1000 रुपये मिळतील, सर्व आरोग्य सेवा मोफत असतील आणि जागतिक दर्जाची रुग्णालये बांधली जातील.
सध्या गोव्यात (Goa) 'आप'कडून वाटण्यात आलेलं हे जाहिरात पत्रक लोकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. याला उत्तर म्हणून उर्वरीत पक्ष काय करतात हे बघण्यासाठी मतदार उत्सुक आहेत. 'आप'चं हे जाहिरात पत्र वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हं दिसत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.