Goa Health camp Dainik Gomantak
गोवा

Goa Health camp: 'धकाधकीच्या जीवनात स्वत:चे आरोग्य जपा'

नूतन बिचोलकर: शिवोलीत स्वामी समर्थ मठात आरोग्य शिबिर

दैनिक गोमन्तक

शिवोली: आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पैसा कमावण्याच्या नादात अनेकांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते; परंतु हीच गोष्ट पुढे धोकादायक बनून सर्वांनाच झळ पोहोचवू शकते. म्हणून ‘आरोग्यम धनसंपदा’ या म्हणीची दखल घेत स्वत:बरोबरच इतरांच्याही आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन म्हापसा येथील नगरसेविका तसेच सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य डॉ. नूतन बिचोलकर यांनी केले.

शिवोलीतील स्वामी समर्थ मठ तसेच स्थानिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी मठाच्या प्रांगणात आयोजित विशेष आरोग्य शिबिरात प्रमुख पाहुण्या या नात्याने डॉ. बिचोलकर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मठाचे अध्यक्ष नीलेश वेर्णेकर, डॉ. उमाली रोहिदास, डॉ. श्रुती शेट नार्वेकर, अजीत च्यारी, दत्ताराम बिचोलकर तसेच समर्थन संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद आरोलकर, यदुवीर सीमेपुरुषकर, हृतिक आगरवाडेकर, अमीत मोरजकर आदी मान्यवर उपस्थित होते. मठाचे अध्यक्ष नीलेश वेर्णेकर म्हणाले, शिवोलीतील स्वामींचा मठ हा धार्मिक, सांस्कृतिक तसेच सार्वजनिक उपक्रमांचा संगम असलेले बहुजनांच्या हिताचे संस्कारी केंद्र आहे. येथील उपक्रमांचा शिवोलीबरोबरच उत्तर गोव्यातील जनता घेत आहे. यावेळी, डॉ. उमाली रोहिदास, डॉ. श्रुती शेट नार्वेकर यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली.

80 रुग्णांना शिबिराचा लाभ

रुग्णांच्या शारीरिक चिकित्सेपासून दंतचिकित्सा आणि आयुर्वेदापासून नेत्रचिकित्सेपर्यंत विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. गुरुवारी सुमारे 80 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिवोली आरोग्य केंद्राच्या डॉ. उमाली रोहिदास, डॉ. अमीना पत्रे, (आयुर्वेद) डॉ. रेश्मा लोटलीकर (दंत चिकित्सक ) डॉ. श्रुती शेट नार्वेकर, नूतन पाळणी, अजीत च्यारी आदींनी भाग घेतला. सूत्रसंचालन पत्रकार संतोष गोवेकर यांनी केले, तर यदुवीर सीमेपुरुषकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: "कुठल्या तोंडानं पाकिस्तानसोबत सामना खेळणार? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून ओवैसी आक्रमक, PM मोदींना केला सवाल

Goa Assembly: गोव्यातून दारु तस्करी रोखण्यासाठी सरकार घेणार होलोग्राम स्टिकर्सची मदत; महाराष्ट्राच्या सीमेवर उभारणार चेकपोस्ट

Goa Assembly Session: "गोवा विद्यापीठाच्या प्रकरणावर सभागृह समिती स्थापन करा" युरी आलेमाव

Viral News: तुम्ही म्हणाल 'शी.. घाण' पण, स्वीडिश प्रौढ मनोरंजन कंपनी कर्मचाऱ्यांना देतंय 30 मिनिटांचा खास ब्रेक, जाणून घ्या कारण

Starlink in india: एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात ब्रेक! स्टारलिंकला फक्त 20 लाख कनेक्शनना परवानगी

SCROLL FOR NEXT