CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : आजारी पडण्यापूर्वीच काळजी घ्या : मुख्यमंत्री सावंत

Goa Cm : साखळीत उभारणार योगिक सायन्स इस्पितळ

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी, आरोग्याची काळजी घेताना केवळ आजार जडल्यानंतरच उपचार घेण्यापेक्षा आजारी न पडण्यासाठी आजच्या काळात स्वतःची तंदुरुस्ती सांभाळणे गरजेचे आहे.

त्यासाठी आज नॅचरोपॅथी व योगिक सायन्स या उपचारांना महत्त्व आले आहे. त्याचबरोबर फिजिओथेरपीचीही आवश्यकता आज लोकांना प्रत्येक आजारातून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

हीच गरज ओळखून साखळीत गोव्यातील पहिले फिजिओथेरपी, नॅचरोपॅथी व योगिक सायन्स इस्पितळ उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

गोवा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नॅचरोपॅथी व योगिक सायन्सतर्फे साखळीतील जुन्या सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आलेल्या फिजिओथेरपी, नॅचरोपॅथी व योगिक सायन्सच्या ओपीडीचे उद्‍घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष रश्मी देसाई, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, गोवा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नॅचरोपॅथी व योगिक सायन्सचे चेअरमन संतोष मळीक, व्यवस्थापिका डॉ. स्नेहा भागवत आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते फीत कापून व समई प्रज्वलित करून या ओपीडींचे उद्‍घाटन करण्यात आले. डॉ. स्नेहा भागवत यांनी स्वागत केले. या केंद्रातून लोकांना समाधानकारक दरात चांगली सेवा देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. संतोष मळीक यांनी आभार मानले.

ऑलिंपिकसाठी फिजिओथेरपिस्ट तयार करणार

२०३६ च्या ऑलिम्पिकसाठी प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट तयार करण्याचे ध्येय आहे. देशात आयुष मंत्रालय स्थापन झाल्यानंतर आयुर्वेद तसेच नैसर्गिक उपचारांना बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. ही उपचार पध्दती आज आंतरराष्ट्रीय पातळीवरही अवलंबली जात असतानाच देशात २०३६ साली होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट खेळाडू तयार करण्याबरोबरच उत्कृष्ट फिजिओथेरपी प्रशिक्षक तयार करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्याची तयारी आत्तापासूनच सुरू करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

‘वेलनेस केअर सेंटर’चे ध्येय

पूर्वी लोक आपला फिटनेस ट्रेनर ठेवत होते, परंतु आज आरोग्याच्या काळजीपोटी लोक आपला योग ट्रेनर ठेवू लागले आहेत. त्यामुळेच आज जागतिक पातळीवर पोहोचलेल्या योगाचे महत्त्व सर्वांनीच लक्षात घेतले आहे.

त्याचबरोबर नॅचरोपॅथी हा विषयही संपूर्ण भारतात लोकांकडून समजून घेतला जात आहे. कोणत्याही प्रकारची औषधे न घेता आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी हे एक ‘वेलनेस केअर सेंटर’ आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT