Kavale News Dainik Gomantak
गोवा

Kavale News: पंचायतक्षेत्रातील भंगारअड्ड्यांवर कारवाई करा!

कवळे ग्रामसभेत मागणीः शेतजमीन बुजवणाऱ्यांवर कारवाईचा आग्रह

गोमन्तक डिजिटल टीम

कवळे पंचायतीच्या ग्रामसभेत पंचायतक्षेत्रातील भंगार अड्ड्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला. पंचायतक्षेत्रात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या भंगार अड्ड्यांवर पंचायतीने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. पंचायतक्षेत्रातील मुख्य रस्त्यांलगत माती टाकून शेतजमीन बुजवण्याचा प्रकार सुरू असून अशा जमिनीवर गाडे थाटण्यात येत आहेत, त्यामुळे शेतीची नासाडी होत असल्याचे सांगून याप्रकरणी योग्य कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

कवळे पंचायतीच्या सभागृहात आज (रविवारी) ही ग्रामसभा झाली. यावेळी सरपंच मनुजा नाईक तसेच उपसरपंच सुशांत कपिलेश्‍वरकर व इतर पंचसदस्य उपस्थित होते. पंचायत सचिवाने मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केला.

पंचायतक्षेत्रात सध्या बारा भंगार अड्डे असून एकालाही पंचायतीने दाखला दिलेला नाही. तरीही कारवाईसाठी गेल्यानंतर अड्ड्यांचे मालक स्थगिती आणतात,अशी माहिती देण्यात आली.

पारंपारिक रथाची वाट अडवू नका !

ढवळी येथील पारंपरिक रथाची वाट कुणी अडवू नये, असे ग्रामस्थांनी सांगितले. या वाटेवर बांधकाम करण्यास पंचायतीने मज्जाव करावा, असेही ग्रामस्थांनी सूचवले. इतर अनेक विषयांवरही या ग्रामसभेत चर्चा करून आवश्‍यक ठराव घेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT