Taekwondo Team Dainik Gomantak
गोवा

Taekwondo Team: गोव्याचे तायक्वोंदो संघ जाहीर

गोवा तायक्वोंदो असोसिएशनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ प्रशिक्षक थेओफिल लोव यांनी संघ जाहीर केले.

गोमन्तक डिजिटल टीम

24 ते 26 फेब्रुवारी या काळात हैदराबाद, तेलंगणा येथील पाचव्या राष्ट्रीय कॅडेट क्योरुगी तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी गोव्याच्या मुला-मुलींच्‍या संघांची निवड करण्यात आली आहे.

मुलांचा संघ : वेदांत वेर्णेकर, सोहन फर्नांडिस, लॉईड दा कॉस्ता, मोहम्‍मद अली, रोमिल साधये, कौशिक राठोड, मोहसीन चौधरी, मयंक कुमार, श्रीकांत लामाणी. मुलींचा संघ : कनिष्का देवशेकर, मेगन फुर्तादो, समृद्धी पाटील, हफिजा सय्यद, शेख इराम कॅरोल, अमिना करनाची, स्नेहा यादव. प्रशिक्षक : सुनील शर्मा, सिराज खान, संघव्यवस्थापक : गिरी काशिनाथ कुर्पासकर, ममता देवी.

खेळाडूंना व प्रशिक्षक तथा व्यवस्थापकांना निरोप देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला फातोर्डा नेहरु स्टेडियमच्या सभागृहात कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गोवा तायक्वोंदो असोसिएशनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ प्रशिक्षक थेओफिल लोव यांनी संघ जाहीर केले. आमदार लॉरेन्स यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त केल्या. असोसिएशनचे सचिव नवीन रायकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT