T B Kunha Statue In Vasco Khariwada Dainik Gomantak
गोवा

T B Kunha Statue: नादुरुस्त कारंजे, कचऱ्याचे साम्राज्य! वास्‍कोतील टी. बी. कुन्हा पुतळा अस्‍वच्‍छतेच्‍या गर्तेत

T B Kunha Statue In Vasco Khariwada: खारीवाडा येथील चौकात थोर स्वातंत्र्यसेनानी टी. बी. कुन्हा यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या चबुतराखाली तसेच आसपासचा भाग गलिच्‍छ बनला आहे.

Sameer Panditrao

वास्को: गोव्याचे थोर स्वातंत्र्यसेनानी टी. बी. कुन्हा यांच्या खारीवाडा येथील पुतळ्याच्या सभोवतालचा परिसर गलिच्छ झाला आहे. त्‍यामुळे नागरिकांतून संताप व्‍यक्त करण्‍यात येत आहे. एकीकडे थोर राष्ट्रपुरुषांची माहिती आजच्या मुलांना देण्याची गरज असल्याचे लोकप्रतिनिधी सांगतात तर दुसरीकडे थोर राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याची योग्य देखभाल करण्यासाठी त्‍यांना फुरसत मिळत नाही, असा विरोधाभास दिसून येत आहे.

खारीवाडा येथील चौकात थोर स्वातंत्र्यसेनानी टी. बी. कुन्हा यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या चबुतराखाली तसेच आसपासचा भाग गलिच्‍छ बनला आहे. तेथे बेवारस लोक ठाण मांडून बसलेले दिसतात. पावसाळा वगळता इतर दिवसांत हे लोक तेथेच झोपतात.

सदर पुतळ्याच्या परिसराला अवकळा आली आहे. सायंकाळच्या वेळी काही पावविक्रेते आपल्या सायकली घेऊन तेथे उभे राहतात. तेथील कारंजे, विविध रंगीत दिवे नादुरुस्त झाल्याने त्यांचा वापर बंद झाला आहे. कचऱ्याचे साम्राज्‍य वाढले आहे. पावसाचे पाणी साचून राहते. ग्रील्स तुटल्‍या आहेत. याकडे मुरगाव पालिका, लोकप्रतिनिधी वा कोणी लक्ष देईल काय? असा सवाल उपस्‍थित करण्‍यात येत आहे.

जुझेंच्‍या काळात दुरुस्‍ती

या प्रकरणाची दखल घेताना पुतळ्याच्या सभोवतालच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे काम माजी महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी हाती घेतले होते. त्यांनी या परिसराला एक नवे स्‍वरूप दिले. पुतळ्याच्या चबुतराभोवती कारंजी बसविण्यात आली. त्या कारंज्यांतील पाण्यावर विविध रंगाच्या दिव्यांचे प्रकाशझोत टाकण्यात आले होते. तथापि, हे सुशोभीकरण काही महिनेच टिकले. त्यानंतर त्या पुतळ्याच्या देखभालीकडे व परिसराच्‍या सौंदर्यीकरणाकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ मिळाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT