Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मिठाईचा व्यवसाय सोडून शिकला वेब डिजाइनिंग; गोव्यात रिसॉर्ट बुकिंगच्या नावाखाली लुटले लाखो रुपये

Madhya Pradesh Crime News: आरोपी ललित हा शहरातील सिग्नल बस्ती येथे राहत असून तो जयपूर येथे मिठाई विक्रीचे काम करत होता.

Pramod Yadav

मध्य प्रदेश: मुरैना येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक तरुण मिठाईचा व्यवसायिक सोडून जयपूरला आणि तेथील सायबर ठगांच्या संपर्कात आला. शॉर्टकटद्वारे श्रीमंत होण्याची हाव त्यालाही लागली आणि मिठाईचा व्यवसाय सोडून त्याने बपेज डिझायनिंग शिकले. यामाध्यमातून त्याने गोवा रिसॉर्ट्सच्या नावाने बनावट वेबपेज तयार करून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला.

बनावट वेबपेजवरुन बुकिंग केलेले पर्यटक गोव्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी बुक केलेले रिसॉर्ट एकतर अस्तित्वातच नव्हते किंवा संबधित रिसॉर्टमध्ये बुकिंगच झाले नसल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाची गोवा पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर तपासाला सुरुवात झाली.

तपासानंतर गोवा पोलिसांना माहिती मिळाली असता, संशयित मुरैना येथी रहिवासी असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी ललित खरे (वय- 23 वर्षे) याला अटक केली आहे. त्याच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ललित हा शहरातील सिग्नल बस्ती येथे राहत असून तो जयपूर येथे मिठाई विक्रीचे काम करत होता. काम करत असताना त्याची सायबर फसवणूक करणाऱ्या काही लोकांशी ओळख झाली. त्यांच्यासोबत राहून तो वेब डिझायनिंग शिकला आणि लोकांना फसवण्याचे काम सुरु केले.

वेब डिझायनिंग शिकल्यानंतर तो जयपूरहून मुरैना येथे आला आणि सिग्नल बस्ती येथील घर सोडून महाराजपूर येथील हुसेन गली येथे भाड्याच्या घरात राहू लागला. येथे लोकांची फसवणूक करण्यासाठी त्याने गोव्यातील 7 रिसॉर्टचे बनावट वेबपेज तयार केले आणि त्याद्वारे रिसॉर्टमध्ये राहण्याच्या बदल्यात आगाऊ बुकिंगच्या नावाखाली पर्यटकांची फसवणूक केली.

गेल्या काही महिन्यांत त्याने पर्यटकांची अडीच ते तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. बुकिंग केलेले पर्यटक गोव्यात आल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

गोवा पोलिसांनी आरोपी ललित खरेला त्याच्या घरातून अटक केली. सिव्हिल लाईन पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT