
SOP for jail security in Goa
पणजी: भू-बळकाव प्रकरणातील मास्टरमाईंड सुलेमान खान उर्फ सिद्दीकी याने गुन्हे शाखेच्या कोठडीतून पलायन केल्याच्या घटनेने गोवा पोलिस अडचणीत सापडले. या घटनेनंतर धडा घेतलेल्या पोलिस खात्याने आता जेलच्या सुरक्षेसाठी नवी मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून खबरदारी घेतली जाणार आहे.
तुरुंगाच्या सुरक्षेसाठी असणारे सुरक्षा रक्षक आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी ही नियमावली तयार केली जाणार आहे. सुलेमान खान फरार प्रकरणासारखी घटना भविष्यात घडू नये म्हणून खबरदारी घेतली जाणार आहे.
याबाबत तुरुंग सुरक्षा रक्षकांना आणि तुरुंगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या जाणार आहेत. ड्युटीच्या वेळा देखील निश्चित केल्या जाणार असल्याने कैदी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये मैत्रिपूर्ण संबंध निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे.
एखाद्या कैदी तुरंग रक्षकाच्या परिचयातील असेल तर वरिष्ठांनी तात्काळ अशा कर्मचाऱ्याला दुसरी जबाबदारी द्यावी, तुरंग रक्षकाने स्वत: याबाबत माहिती द्यावी असे नियमावलीत म्हटलंय.
सुलेमान खान गुन्हे शाखेच्या कोठडीतून फरार झाल्यानंतर पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या पलायन प्रकरणात एका आयआरबी कॉन्स्टेबलचा सहभाग उघडकीस आल्याने त्याला सेवेतून बडतर्फ देखील करण्यात आले.
पोलिस खात्याने या घटनेची गंभीर दखल घेत आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक याला सेवेतून बडतर्फ केले. तसेच, हेड कॉन्स्टेबल सर्वेश कांदोळकर याला सेवेतून निलंबित केले. याशिवाय आणखी चार पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. दरम्यान, भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून पोलिस विभाग विशेष खबरदारी घेताना दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.