Suspicious vehicles in Bicholim Dainik Gomantak
गोवा

Goa Collage: डिचोलीतील कॉलेजजवळ विनानंबरप्लेट दुचाकी!

संशयास्पद वाहने ताब्यात : पोलिसांची कारवाई

दैनिक गोमन्तक

शहरातील एका उच्च माध्यमिक विद्यालयातील ‘पेपर स्प्रे’ प्रकरण शांत होत असतानाच, तालुक्यातील एका महाविद्यालयाजवळ नंबरप्लेट नसलेल्या चार संशयास्पद दुचाकी आढळून आल्या आहेत. यातील दोन दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. तर अन्य दुचाकींना ‘लॉक’ लावली आहेत.

या संशयास्पद दुचाकी विद्यार्थ्यांच्या की अन्य कोणाच्या त्याबाबत संशय असला, तरी त्या कॉलेज विद्यार्थ्यांच्याच असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. संबंधित महाविद्यालयाच्या कंपाउंडबाहेर विद्यार्थी आपल्या दुचाकी ‘पार्क’ करतात, त्याठिकाणी नंबरप्लेट नसलेल्या या दुचाकी आढळून आल्या आहेत.

या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली असून, शाळांजवळील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाविद्यालयाच्या कंपाउंडबाहेर पार्क केलेल्या दुचाकींमध्ये नंबरप्लेट नसलेल्या दुचाकी असल्याचे दिसून येताच, महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून यासंबंधी डिचोली पोलिसांना माहिती देण्यात आली.

बनावट नंबरप्लेट्‌स

पोलिसांनी या संशयास्पद दुचाकींची झडती घेतली असता, धक्कादायक प्रकार समोर आला. एका दुचाकीच्या डिकीमध्ये वेगवेगळ्या बनावट नंबरप्लेट्‌स आढळून आल्या. पोलिसांनी लागलीच ही दुचाकी ताब्यात घेऊन पोलिस स्थानकात आणली. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संबंधित दुचाकीधारक वेगवेगळ्या नंबरप्लेट वापरत असावा, असा संशय आहे.

गस्तीची मागणी

कॉलेज आवारात नंबरप्लेट नसलेल्या दुचाकींबद्दल संशय आल्याने आणि कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये. त्यासाठी यासंबंधी पोलिसांना कळविण्यात आले, अशी माहिती संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांनी दिली. असे प्रकार रोखण्यासाठी सकाळी कॉलेज भरताना पोलिस गस्त ठेवावी, अशी मागणी केल्याचेही प्राचार्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काँग्रेसची 'छात्रों की गुंज' मोहीम; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात राज्यात जनजागृती

Goa Heavy Rain: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या कारवर कोसळले झाड; आई अन् दोन मुले सुखरूप

Goa Heavy Rain: साळ-खोलपेवाडी येथे घरावर कोसळला वृक्ष; दोन लाखांच्या मालमत्तेचे नुकसान, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

Goa Water Supply: धरणांमधील पाणी वाढवण्‍यावर आता जलसंपदा खात्‍याचे लक्ष; शुद्धीकरणासाठी 'पेयजल'क‍डून नद्यांतील पाण्‍याचा वापर

Borim Bridge: लाखो रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात बोरी पुलावर खड्डे; दुरुस्ती कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT