suspicious vehicle Panaji Dainik Gomantak
गोवा

संशयास्पद टिंटेड गाडी, नंबरप्लेटही नाही; हवाईहल्ल्यानंतर पणजीत फिरणारा 'तो' मालक सापडला Watch Video

Panaji Tinted Car Viral Video: पणजी शहरात सकाळी-सकाळी एक नंबर प्लेट नसलेली, टिंटेड गाडी फिरताना दिसत होती

Akshata Chhatre

पणजी: खरं तर देशात सामान्य नागरिकांना टिंटेड गाड्या चालवायला परवानगी नाही, तरीही बुधवार (दि.07) रोजी पणजी शहरात सकाळी-सकाळी एक नंबर प्लेट नसलेली, टिंटेड गाडी फिरताना दिसत होती. पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने मध्यरात्री हवाईहल्ला करून पाकिस्तानला चोख प्रतिउत्तर दिलं होतं आणि अशा तणावग्रस्त परिस्थितीत ही गाडी आली तरी कुठून असा प्रश्न निर्माण झाला होता.

दैनिक गोमंतकने केलेल्या चोख कामगिरीमुळे गोवा वाहतूक पोलिसांचं याकडे लक्ष वळलं आणि त्यांनी देखील वेळ न घालवता त्वरित कारवाई केली. समोर आलेल्या माहितीनुसार सध्या टिंटेड ग्लास आणि नंबर प्लेट या नसलेल्या गाडीला ट्रॅफिक पोलिसांनी ताब्यात घेतलीये.

पोलिसांच्या माहितीप्रमाणे पणजीत असलेल्या स्मार्ट सिटीच्या कॅमेराच्या मदतीने गाडी चौगुले शोरूमजवळ सापडली आहे. या गाडीवर कारवाई करत असताना पोलिसांनी टिंटेड ग्लास आणि नंबर प्लेट नसल्याने वाहनाच्या मालकाला दंड ठोठावण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी रायबंदरहून पणजी शहराच्या दिशेने जात होती. स्मार्ट सिटीच्या कॅमेऱ्यामधून मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी कला अकादमीपर्यंत ट्रेस झाली मात्र त्यापुढे तिचा पत्ता सापडेना, अशावेळी ही गाडी जवळपासच कुठेतरी असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आणि त्याप्रमाणे चौगुले शोरूमजवळ ही गाडी पोलिसांच्या हाती लागलीये.

ही गाडी कोणाची?

पणजी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी सायरास नावाच्या एका महाराष्ट्रीय व्यक्तीची आहे. पोलिसांना या गाडीची एक नंबरप्लेट देखील सापडली आहे आणि ही गाडी केवळ विकण्यासाठी आणली असल्याचं त्यांनी सांगितलंय.

पोलिसांनी सर्व आवश्यक कारवाई आणि तपासणी केलेली आहे आणि या गाडीत धोकादायक असं काहीही आढळलं असल्याने त्यांनी केवळ चलान जारी करून ही गाडी पुन्हा मालकाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT