
पणजी: राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करायला सुरुवात केलीये. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात राज्यभरात वेगवेगळ्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी रस्ते अपघातांचा आकडा काही प्रमाणात कमी असल्याचं आढळून आलं आहे.
१ मार्च ते ३१ मार्च या महिन्याभराच्या कालावधीत गोवा पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या ५३८ चालकांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या व्यातिक्रित हेल्मेटशिवाय गाडी चळवणाऱ्या १८६६, सायलेन्सरचा अयोग्य वापर करत गाडी चळवणाऱ्या ४७ आणि वैध दाखल्याशिवाय गाडी चालवणाऱ्या २८ चालकांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय.
नवीन वर्ष सुरु झाल्यापासून तीन महिन्यात दारू पिऊन गाडी चालवण्याचे २०६४ तर हेल्मेटशिवाय गाडी चालवण्याचे १३०९१ गुन्हेही नोंद करण्यात आलेत, यामध्ये १२,८८५ गुन्हे नो-एंट्रीच्या कक्षात गाडी नेल्यामुळे नोंद करण्यात आलेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनपर्यंत रस्ते अपघातांचं प्रमाण काहीसं कमी आहे असं देखील पोलीस म्हणालेत. पोलिसांकडून रस्ते अपघात रोखण्यासाठी वेळोवेळी जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
प्रत्येक वाहन चालकाला वाहतूक नियम माहिती असावेत आणि रस्ते अपघात कामी व्हावेत हाच त्यामागचा प्रमुख उद्देश असतो.
गोव्यामध्ये १२३ बॉडी कॅमेरा आहेत, यामधील प्रत्येक बॉडी कॅमेऱ्याचं वाटप ट्रॅफिक सेलमध्ये करण्यात आलंय. या बॉडी कॅमेराचा वापर फक्त पोलीस इन्स्पेक्टर आणि सब इन्स्पेक्टर वापर करू शकतात. बॉडी कॅमेरा वापरणे हे पोलिसाच्या सुरक्षतेसाठी आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पुरावा म्हणून या कॅमेऱ्यामधील रेकॉर्डिंगचा वापर करता येतो अशी माहिती वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.