Goa Crime Prathamesh Gawde Case Accused Colavale Jail 
गोवा

Prathamesh Gawde Case: प्रथमेश प्रकरणात धक्कादायक अपडेट; आरोपी महिला पोलीस कॉन्स्टेबलचा तुरुंगात जीवन संपवण्याचा प्रयत्न

Colvale Jail Crime: निलंबनानंतर संशयित महिला कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवरून उडी घेत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला

Akshata Chhatre

Goa Police Constable Prathamesh Gawde Case:

कोलवाळ: पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी लपीसी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना गुरुवारी (दि. ७ नोव्हेंबर) रोजी निलंबित करण्यात आले आणि या निलंबनानंतर तनिष्का चव्हाण आणि प्रिती चव्हाण यांनी कोलवाळ कारागृहातील पाण्याच्या टाकीवरून उडी घेत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात दोघीही गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

२२ वर्षीय पोलिस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक झालेल्या दोन महिला पोलिस कॉन्स्टेबल्सच्या जामिनावर सुनावणी पूर्ण झाली. याबाबत शुक्रवारी सुनावणी होणार आहे. अटकेनंतर गुरुवारी त्या दोघींना पोलीस खात्यातील सेवेतून निलंबित करण्यात आले.

समोर आलेल्या निर्णयानुसार एलपीसी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना निलंबित करण्यात आले.

आत्महत्येपूर्वी पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे याने व्हिडिओ संदेशामधून दोन्ही एलपीसी आणि त्यांच्या भाऊ आकाश चव्हाण त्याचा मानसिक छळ करीत आल्याचा दावा केला होता. त्याच्या याच व्हिडीओच्या आधारे सायबर पोलिसांनी तक्रार दाखल करून गुन्हा नोंद केला. चौकशीनंतर प्रीती चव्हाण आणि तनिष्का चव्हाण या दोघींना अटक करण्यात आली, मात्र अजून तिसरा संशयित आरोपी आकाश चव्हाण फरार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran War: ''युरेनियम कोणालाही सोपवणार नाही'', इराण-अमेरिका संघर्ष विकोपाला; ट्रम्पच्या दाव्याला सुरुंग

PM Modi: पंतप्रधान मोदी देशाला करणार संबोधित! महिला आरक्षण विधेयक रद्द झाल्यानंतर घेणार मोठी भूमिका?

DA Hike: मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार मोठा लाभ

US Iran War: "आमच्या अटी मान्य करा तरच मार्ग खुला" इराणचा टायगर अवतार! व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला दिलं खुलं आव्हान VIDEO

Crime News: प्रेम, वाद अन् क्रूर हत्या! हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आली अन् काळ बनून परतली; काळजाचा थरकाप उडवणारं हत्याकांड

SCROLL FOR NEXT