Amit Naik Dainik Gomantak
गोवा

Amit Naik: बडतर्फ कॉन्स्टेबल अमित नाईकने केला जीवन संपवण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Suleman Khan Escape Case: बडतर्फ नाईकला पणजी कोर्टासमोर हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Pramod Yadav

पणजी: जमीन हडप प्रकरणातील मास्टर माईंड सुलेमान खानला फरार करण्यास मदत करणाऱ्या बडतर्फ आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईकने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अमितने टॉलेटमधील फिनेल पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला पण, त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी नाईक यांना रोखले आणि मोठा अनर्थ टळला.

आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईकने शनिवारी हुबळीत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. शरण आलेल्या नाईकला गोव्यात आणून त्याला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. बडतर्फ नाईकला पणजी कोर्टासमोर हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

अमित नाईकने स्वत:चे आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला. रेस्टरुमच्या टॉयलेटमध्ये ठेवलेले फिनेल प्राशन करुन नाईकने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, यावेळी हजर असलेल्या पोलिसांमुळे नाईकला फिनेल पिण्यापासून तात्काळ रोखण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्व आवश्यक तपासण्या केल्यानंतर नाईकची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अमित नाईकने जमीन हडप प्रकरणातील मास्टरमाईंड सुलेमान खानला कोठडीतून बाहेर काढत स्वत:च्या दुचाकीवरुन कर्नाटकात पोहोचवले. अमितच्या या कारनाम्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले. अमित हुबळीत पोलिसांना शरण आला. त्यानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन सेवेतून बडतर्फ करण्यात आले. सध्या त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तीन कोटी रुपयांत झाला सौदा

सुलेमान खानला फरार करण्याचा सौदा तीन कोटी रुपयांत झाल्याची माहिती समोर आली आहे. सुलेमानने एवढे पैसे एकट्या अमित नाईकला दिले का यात आणखी कोणाचा हात आहे? याचा तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इबोला संसर्गाबाबत केंद्र सरकारकडून हेल्थ ॲडव्हायझरी जारी, देशातील सर्व आंतरराष्ट्रीय एंट्री पॉईंट्सवर कडक स्क्रिनिंगचे आदेश

Goa Weather: 48 तास महत्त्वाचे! दोन दिवस कोसळणार पाऊस; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

Odisha Crime: ओडिशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना! जिल्हा रुग्णालयातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार; एका महिलेसह तिघे अटकेत

Manoj Parab Resign: राज्याच्या राजकारणात खळबळ! मनोज परब यांनी दिला 'आरजीपी'चा राजीनामा

Goa politics: सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी; मडगाव पालिका बैठक, सरदेसाईंच्या प्रस्तावित विकासकामांवरून वाद

SCROLL FOR NEXT