Suleman Khan: सुलेमान खान फरार प्रकरणातील कॉन्स्टेबलला चार दिवसांची पोलीस कोठडी

Constable Amit Naik Arrest: पोलिसांनी त्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करत नोकरीतून काढून टाकले
Constable Amit Naik Arrest: पोलिसांनी त्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करत नोकरीतून काढून टाकले
Constable Amit Naik ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

Constable Amit Naik Arrest

पणजी: गोवा जमीन हडप प्रकरणातील आरोपी सुलेमान खान याला पोलीस कोठडीतून पळून जायला मदत केलेल्या कॉन्स्टेबल अमित नाईक याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी आयआरबी कॉन्स्टेबलची नोकरीतून हकालपट्टी करण्यात आली होती आणि कॉन्स्टेबल अमित नाईक हुबळी येथे पोलिसांना शरण आला होता.

पोलिसांनी त्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करत नोकरीतून काढून टाकले.पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याने आरोपी सुलेमान खानला १३ डिसेंबर रोजी पहाटे अडीच वाजता कोठडीतून बाहेर काढत पळून जायला मदत केली होती.

५५ वर्षीय आरोपी सुलेमान खान याच्यावर जमीन हडप प्रकरण आणि इतर गुन्हे दाखल झाले आहेत. हा आरोपी गेल्या साडेचार वर्षांपासून फरार होता आणि पोलिसांना १२ डिसेंबर रोजी त्याला पकडायला यश मिळाले होते, मात्र एवढ्या भयंकर आरोपीला एका पोलिस कॉन्स्टेबलनेच पळून जायला मदत केल्याने सगळीकडेच खळबळ उडाली होती.

Constable Amit Naik Arrest: पोलिसांनी त्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करत नोकरीतून काढून टाकले
Suleman Khan: खळबळजनक! सुलेमान खानच्या पलायनाचा 3 कोटी रुपयांत झाला सौदा; मध्यस्थी कोण? गोव्यात रंगली चर्चा

पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याने सुलेमान खानला पळून जायला मदत केली आणि याप्रकरणी जुने गोवे पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

अमित नाईक कोण आहे?

गोमंतकीय वाटणारा आयआरबीचा कॉन्स्टेबल अमित मूळचा कर्नाटकातील आहे. सध्या तो जयरामनगर- दाबोळी येथे राहायला असून, त्यांचा चांगला बंगला आहे. वडिलांचे मिक्सर दुरुस्तीचे दुकान आहे. याशिवाय काही दुकाने त्याने भाड्याने दिली आहेत. अमित कर्तव्यावर असताना इतरांवर दादागिरी करायचा असे माहिती समोर आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi targets Amit Shah
Student Protest Police Lathicharge
60 Crore Fee Scam
Amit Shah, BL Santosh Goa visit
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com