Court Dainik Gomantak
गोवा

Vasco Extortion Case: खंडणीसाठी वास्कोच्या व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

Vasco Extortion Case: आरोपींनी 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत वास्को येथून हरीश कुमार या व्यावसायिकाचे अपहरण केले होते.

सुशांत कुंकळयेकर

Vasco Extortion Case

खंडणीसाठी वास्को येथील एका व्यावसायिकाचे अपहरण केल्या प्रकरणी दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश, क्षमा जोशी यांनी आज आरोपी अब्दुल कादर जावळी याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याशिवाय 10,000 रुपये दंड भरण्याचा आदेश दिला.

या खटल्यातील दुसरा आरोपी सलीम खान याला संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त केले. तिसरा आरोपी राजेंद्र कुमार कहार हा सध्या जामिनावर सुटून फरार असून त्याच्या विरोधातील निकाल राखून ठेवला आहे.

ही घटना जून 2018 मध्ये घडली होती ज्यात आरोपींनी 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत वास्को येथून हरीश कुमार या व्यावसायिकाचे अपहरण केले होते.

सरकारी वकील देवानंद कोरगावकर यांनी राज्याच्या वतीने काम पाहताना २९ साक्षीदार पेश केले. या प्रकरणाचा तपास वास्को पोलिस स्थानकाचे तत्कालीन निरीक्षक नोलास्को रापोस यांनी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: क्रीडा आणि संस्कृती मंत्र्याविना होणार पावसाळी अधिवेशन; गोवा मंत्रिमंडळात अधिवेशनानंतर फेरबदल

इंग्लंडमध्ये '1947' च्या आठवणी ताज्या, राजीव शुक्लांनी किंग चार्ल्सना दिले 'स्कार्स ऑफ 1947' पुस्तक भेट!

Viral Video: दुधसागर धबधब्याचा नयनरम्य व्हिडिओ व्हायरल, निसर्गाची किमया पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Digital India Reel Contest: 'रील' बनवायला आवडतंय? दाखवा तुमचं टॅलेंट आणि जिंका 15,000 रुपये, केंद्र सरकारचा भन्नाट उपक्रम वाचा

Non-Veg Milk: 'नॉन-व्हेज मिल्क' म्हणजे काय? भारत-अमेरिका वादाचं कारण बनलेलं काय आहे हे दूध?

SCROLL FOR NEXT