Crime|Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: मडगाव गांजा तस्करीतील फरार संशयिताला बिहारमध्ये अटक! ‘एनसीबी’ची कारवाई

Goa Crime: अटक करून गोव्यात आणलेल्या या संशयिताला १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: केंद्रीय नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) गोवा आणि रेल्वे सुरक्षा दलाने २०२३ मध्ये मडगाव रेल्वे स्थानकावर कारवाई करून तीन किलो गांजा जप्त केला होता. या प्रकरणातील मुख्य गांजा तस्कर आदित्य प्रकाश (२१, बिहार) याला अटक केली आहे. अटक करून गोव्यात आणलेल्या या संशयिताला १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

केंद्रीय नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) गोवा विभागाला नागपूर येथून एक युवक गोव्यात रेल्वेमार्गे गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एनसीबीने रेल्वे सुरक्षा दलाने ११ जून २०२३ रोजी रात्री ९ वाजता मडगाव रेल्वे स्थानकावर सापळा रचला होता.

त्यानुसार, पथकाने मडगाव उडपी सुपरफास्ट एक्सप्रेस या रेल्वेतून आलेल्या औरंगाबाद बिहार येथील रहिवासी संशयित अविनाश चंद्रा (२५, मूळ झारखंड) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडून ३ लाख रुपये किमतीचा ३ किलो गांजा जप्त केला होता.

दरम्यान, एनसीबीने मागील अनेक महिने सापळा रचून मुख्‍य गांजा तस्कर आदित्य प्रकाश (२१, बिहार) याला १२ ऑगस्ट रोजी बिहारमधून ताब्यात घेऊन गोव्यात आणले. त्यानंतर त्याला वरील प्रकरणात अटक करण्यात आली.

चौकशीत आदित्यचे नाव

याप्रकरणी एनसीबीने संशयित अविनाश याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम २० (बी) ii (बी) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला. याप्रकरणी एनसीबीने अविनाश चंद्रा याची चौकशी केली असता, त्याने आदित्य प्रकाश याच्याकडून वरील गांजा घेतल्याची माहिती दिली होती. तर वरील गांजा उडपीतील एका व्यक्तीला देणार असल्याची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT