Rape Case Dainik Gomantak
गोवा

Rape Case: लंडन बलात्‍कार प्रकरणातील संशयिताचे प्रत्‍यार्पण करावे

Rape Case: न्‍यायालयाचा आदेश : मूळ गोमंतकीय आरोपी

दैनिक गोमन्तक

Rape Case: 2017 मध्‍ये लंडन येथे एका पबमध्‍ये एका युवतीवर बलात्‍कार केल्‍याचा आराेप असलेल्‍या आणि लंडन शहरातील न्‍यायालयात खटला चालू असलेल्‍या जुझे इनासियो काेता या मूळ गोमंतकीय; पण सध्‍या पाेर्तुगीज नागरिकत्‍व घेतलेल्‍या संशयिताला लंडनमध्‍ये प्रत्‍यार्पण करण्‍यासाठी प्रक्रिया सुरू करावी.

असा आदेश नवी दिल्‍लीतील पतियाळा हाऊस न्‍यायालयाचे मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी अभिषेक कुमार यांनी दिला आहे.

लंडन पोलिसांच्‍या आराेपाप्रमाणे, जुझे कोता हा तिथे एका पबमध्‍ये काम करायचा. त्‍या पबमध्‍ये एक वाढदिवस पार्टी साजरी करण्‍यासाठी आलेल्‍या एका युवतीला त्‍याने पबच्‍या माजघरात बाेलावून तिच्‍यावर बलात्‍कार केल्‍याचा आराेप आहे.

या प्रकरणाची सुनावणी लंडन न्‍यायालयात चालू असताना संशयित काेता तेथून नाहीसा झाला. सध्‍या त्‍याने गाेव्‍यात आसरा घेतल्‍याची माहिती पुढे आली आहे. त्‍याला लंडनमध्‍ये प्रत्‍यार्पित करावे यासाठी ब्रिटिश सरकारकडून भारताच्‍या परराष्‍ट्र खात्‍याला अर्ज आला हाेता.

ही प्रक्रिया सुरू करण्‍यासाठी परराष्‍ट्र व्‍यवहार मंत्रालयाने दिल्‍ली न्‍यायालयात याचिका दाखल केली हाेती. यावेळी कोता याची बाजू मांडताना त्‍याच्‍या वकिलाने कोता हा स्‍वत: वर्णभेदाचा पीडित असून त्‍याच्‍यावर खाेटा आरोप दाखल करण्‍यात आल्‍याचा दावा केला होता.

त्‍याशिवाय गोव्‍यात त्‍याच्‍यावर आणखी एका फौजदारी प्रकरणात सुनावणी चालू असल्‍याने तो गोवा सोडून लंडनला जाऊ शकत नाही, असा दावा केला हाेता. मात्र, संशयिताविराेधात ब्रिटिश पाेलिसांनी पुरेसे पुरावे न्‍यायालयात सादर केल्‍यामुळे त्‍याला प्रत्‍यार्पित करण्‍यात यावे, असा दिल्‍ली न्‍यायालयाने निर्वाळा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT