Suryakumar Yadav In Goa Dainik Gomantak
गोवा

Suryakumar Yadav: आशिया कप जिंकल्यानंतर 'सूर्या'ची गोव्यात एंट्री! मंत्री माविन गुदिन्हो यांनी केलं स्वागत Watch Video

Suryakumar Yadav In Goa: भारताच्या टी-20 क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव गोव्यात पोहोचला असून त्याचे दाबोळी विमानतळावर मंत्री माविन गुदिन्हो यांनी स्वागत केले.

Sameer Amunekar

गोवा: भारताच्या टी-20 क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव गोव्यात पोहोचला असून त्याचे दाबोळी विमानतळावर मंत्री माविन गुदिन्हो यांनी स्वागत केले. यावेळी क्रिकेटप्रेमी, स्थानिक राजकीय नेते आणि अधिकारी यांची उपस्थिती पाहायला मिळाली.

दरम्यान, मुरगावमधील चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलेले भव्य स्वरुपाचे ‘१९१९ स्पोर्टस’ क्रिकेट मैदान लवकरच क्रिकेटच्या सेवेसाठी खुलं होणार आहे. हे मैदान पाच हजार आसनक्षमतेचे असून, वर्ना औद्योगिक वसाहतीतील लोटली पंचायत क्षेत्रात साकारले गेले आहे.

या नव्या क्रिकेट मैदानाचे लोकार्पण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. लोकार्पण समारंभामध्ये स्थानिक खेळाडू, युवा संघटनांचे प्रतिनिधी आणि क्रिकेट संघाचे अधिकारीही सहभागी होणार आहेत.

‘१९१९ स्पोर्टस’ मैदानाला आधुनिक सुविधा असतील आणि ते गोव्यातील क्रिकेट खेळासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनेल. या मैदानाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल.

वेर्णा औद्योगिक वसाहतीत राष्ट्रीय महामार्गापासून काही अंतरावर ‘१९१९ स्पोर्टस’ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान साकरले आहे. ७९ यार्ड जागेत या मैदानाचे बांधकाम करण्यात आले आहे. मैदानावर एकूण नऊ खेळपट्ट्या आहेत, तसेच दिन-रात्र सामने खेळविण्यासाठी प्रकाशझोत व्यवस्थाही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT