Surla  Dainik Gomantak
गोवा

Surla Project: 'सुर्ला प्रकल्प रद्द करा, पर्यावरण वाचवा'! ग्रामस्‍थ व पर्यावरणप्रेमींची PM मोदी, CM सावंतांकडे आग्रही मागणी

Surla Project Goa: क्‍लॉड आल्‍वारीस यांनी पंतप्रधान मोदी यांना सादर केलेल्या निवेदनाचा तपशील मांडला. त्‍यात भगवान महावीर उद्यान, म्हादई अभयारण्य तसेच इतर क्षेत्रांतील विकासप्रकल्पांना आक्षेप घेण्‍यात आला आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोव्याच्या संरक्षित जंगलांतील आणि जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पठारांवरील विनाशकारी प्रकल्पांविरोधात पर्यावरणतज्ज्ञ, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते एकवटले आहेत. सुर्ला प्रकल्प ताबडतोब रद्द करा आणि गोव्‍याचे पर्यावरण वाचवा, अशी मागणी त्‍यांनी मुख्‍यमंत्री व पंतप्रधानांकडे केली आहे.

यानिमित्ताने येथे आयोजित पत्रकार परिषदेला ‘गोवा फाऊंडेशन’चे निमंत्रक डॉ. क्‍लॉड आल्‍वारीस, पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र केरकर, कालेचे सरपंच नरेंद्र गावकर, उपसरपंच सांगवी नाईक, पंचसदस्य बाळू रेकडो आणि गंगाधर गावकर उपस्थित होते. दरम्यान, ‘आमचे मोले’ गटाने गोव्यातील पठारे जोपासावीत अशी मागणी केली.

क्‍लॉड आल्‍वारीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केलेल्या निवेदनाचा तपशील मांडला. त्‍यात भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान, म्हादई अभयारण्य तसेच इतर संरक्षित क्षेत्रांतील विकासप्रकल्पांना तीव्र आक्षेप घेण्‍यात आला आहे. राजेंद्र केरकर यांनी सांगितले की, गोव्यातील पठारांवरील जागा उपयोगी नाही असे म्हणून दुर्लक्षित केली जात आहेत.

प्रत्यक्षात ही पठारे अनेक दुर्मीळ वनस्पतींचे घरे आहेत. संशोधनानुसार ४० टक्के हर्बसीयस वनस्पती तेथे आहेत. सुर्ला पठारावरील प्रस्तावित पर्यटन प्रकल्पामुळे पाण्याचा प्रवाह, जैविक सूक्ष्म अधिवास आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात येणार आहे.

सुर्लाचे पठार बिबट्या, गवा, अस्वलांसाठी महत्त्वपूर्ण

कर्नाटकातून आणलेला खनिज साठा काले गावातील संरक्षित अभयारण्याच्या हद्दीत टाकण्‍यास गोवा सरकारने परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाने यावर बंदी घातली होती. सुर्ला (म्हादई अभयारण्य) येथील ८ कोटींचा आलिशान प्रकल्प प्रस्तावित व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य झोनमध्ये आहे. बिबट्या, गवा व अस्वलांसाठी हे ठिकाण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रकल्पासाठी इलेक्ट्रिक कुंपण घालण्याचा प्रस्ताव हा अभयारण्य नियमांचा थेट भंग असल्याची टीका पर्यावरणतज्ज्ञांनी केली.

सुर्ला प्रकल्पासाठी अद्याप कोणताही पुरेसा ‘इआयए’ अहवाल उपलब्ध नाही. बिबट्यांच्या हालचालीवर या प्रकल्पाचा काय परिणाम होईल, याचाही विचार प्रशासनाने केलेला नाही. या पठारावर दुर्मीळ वनस्‍पती आहेत.
राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

Goa Opinion: ‘गोंयकारांनी’ घरांसाठी सरकारी दयेवर अवलंबून राहावे का?

Diwali In Goa: 'तिखशे फोव, वझ्या’त खाजीचे लाडू, फेणोरी, चुरमो'! गोव्यातील आगळीवेगळी दिवाळी

Ravi Naik: गोव्याच्या राजकारणाला वळण देण्याची हिकमत असलेला नेता 'रवी नाईक'

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

SCROLL FOR NEXT