Srula Baras Agriculture tradition Dainik Gomantak
गोवा

Surla News : सुर्ला येथे ''परंपरागत बारस'' उत्साहात साजरा

तिथे ब्राह्मण, घाडी यांच्यातर्फे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. यावेळी भगवान बलराम प्रतिमेचे सर्वांनी पूजन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Surla News: सावईवेरे, सुर्ला गावाला कृषी परंपरा लाभली आहे. वायंगणी शेतीला सुरवात करताना शेती व शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी तसेच शेतीतून चांगले उत्पन्न मिळावे यासाठी परंपरागत ''बारस'' उत्सव साजरा करण्यात येतो.

यानिमित्त गुरुवारी सिद्धेश्वर मंदिरात नांगराची विधिवत पूजा करून नांगर वाजत गाजत जोशीभाट येथे नेण्यात आला. तिथे ब्राह्मण, घाडी यांच्यातर्फे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. यावेळी भगवान बलराम प्रतिमेचे सर्वांनी पूजन केले.

भारतीय किसान संघाचे गोवा प्रांत महामंत्री श्रीरंग जांभळे यांनी भगवान बलराम यांचे शेती व शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.

ते म्हणाले की, शेती व शेती आधारित उद्योग हा भारतीय समाजाचा सांस्कृतिक वारसा आहे. कालांतराने यात होत आलेले बदल स्वीकारून सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सर्वांनी या उद्योगांना आपापल्या परीने उभारी देण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटित प्रयत्नांची आवश्यकता असून भारतीय किसान संघात सामील होऊन या प्रयत्नांना गती देण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित यावे. राज्याच्या कृषी धोरणासाठी आवश्यक सूचना मांडण्यासाठी ग्रामसभा व शेतकऱ्यांच्या सभा यांचा सर्वांनी वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सरपंच विश्रांती सुर्लकर, पंच सुभाष फोंडेकर, किसान संघाच्या ग्राम समितीचे विष्णू नाटेकर, दत्ता सातोडकर, स्वयंपूर्ण मित्र व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विष्णू नाटेकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT