Surel Tilve Dainik Gomantak
गोवा

'ही तर सामान्यांची क्रूर थट्टा': सुरेल तिळवे

भाजप सरकारने लागू केलेल्या नव्या गॅझेटनुसार निवासी आणि व्यावसायिक जागेच्या घरपट्टीत मोठी वाढ झाल्याचे आढळून येत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजप सरकारने लागू केलेल्या नव्या गॅझेटनुसार निवासी आणि व्यावसायिक जागेच्या घरपट्टीत मोठी वाढ झाल्याचे आढळून येत आहे. यावरून भाजप सामान्यांची क्रूर थट्टा करत असल्याची टीका आम आदमी पक्षाच्या वतीने सुरेल तिळवे यांनी केली.

पणजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तिळवे म्हणाले, कोविडमुळे लोकांवर विपरित परिणाम होत असताना भाजपचे हे नवे धोरण  अमानवी आहे.

हा नवा घरपट्टी दर निवडणुकीनंतर लागू केला असून भाजप सरकारने पुन्हा एकदा गोव्याची लूट सुरू केली आहे. संपूर्ण राज्य कोविडच्या विळख्यात अडकले असून लोक आर्थिकदृष्ट्या त्रस्त झाले आहेत. या परिस्थितीतही लोकांना किराणा, गॅस, पेट्रोलच्या वाढलेल्या किमतीचा सामना करावा लागत आहे. आता सरकारच्या या घरपट्टी दरवाढीमुळे अल्प उत्पन्न गटातील लोकांवर आर्थिकदृष्ट्या आणखी भर पडणार आहे, असे तिळवे यांनी सांगितले.

दिल्ली येथे घेतलेल्या बैठकीत कोळसा हाताळणी नियंत्रणासाठी बंदर विधेयकात दुरुस्ती, किनारी बंदर क्षेत्र अधोरेखित केलेले रद्द करणे आणि वाळूच्या ढिगाऱ्यांचा समावेश या सर्व मागण्या केंद्राने धुडकावून लावल्या आहेत, अशी माहिती तिळवे यांनी यावेळी दिली. किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यात अनेक त्रुटी असल्यामुळे गोमंतकीयांनी याचा सातत्याने विरोध केला आहे. चेन्नईतील एका संस्थाने केलेल्या आराखड्यात अनेकांची घरे, जागा दाखवलेल्या नाहीत, असेही तिळवे म्हणाले.

800 रुपयांवरून तब्बल 4 हजार

सध्या सरकारने पंचायत क्षेत्रातील घरपट्टीत वाढ लागू केली आहे. याआधी निवासी जागेसाठी प्रतिचौरस मीटर 8 रुपये असा कर होता. तो आता 40 रुपये मीटर इतका करण्यात आला आहे. यापूर्वी, व्यावसायिक जागेसाठी 10 रुपये प्रतिचौरस मीटर शुल्क आकारले जात होते. परंतु ते आता 200 रुपये प्रतिचौरस मीटर करण्यात आले आहे. यापूर्वी वर्षाला 800 रुपये भरणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीला सध्या 100 चौरस मीटरच्या घरासाठी 4 हजार रुपये मोजावे लागणार आहेत, असे तिळवे यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT