Salcete and Mormugao taluka fungus found  in rice
Salcete and Mormugao taluka fungus found in rice Dainik Gomantak
गोवा

नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातून सडलेल्‍या तांदळाचा पुरवठा; स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार संतप्त

दैनिक गोमन्तक डिजिटल

कुठ्ठाळ्ळी येथील नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारांना मोठ्या प्रमाणात सडलेल्‍या तांदळाचा पुरवठा झाला आहे, असा दावा गुरुवारी दुकानदार संघटनेचे सरचिटणीस गांधी हेन्‍रीक यांनी केला आहे.

‘काही गोण्‍याच खराब असतील आणि त्‍यामुळे सर्व धान्‍य खराब आहे म्‍हणणे अयोग्‍य आहे’, असा नागरी पुरवठा खात्‍याच्‍या संचालकांचा दावा त्‍यांनी फेटाळला आहे. सरकारने दक्षिण गोव्‍यातील सर्व रेशन दुकानांवरील तांदळाचा साठा तपासावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सासष्‍टी व मुरगावातील स्‍वस्‍त धान्‍य दुकानांत निकृष्‍ट दर्जाचा तांदूळ आढळून आल्‍यानंतर दक्षिण गोव्‍यातील बहुतांश रास्‍त धान्‍य दुकानदार सजग झाले आहेत. आपापल्‍या कैफियती ते मांडत आहेत.

धान्‍य दुकानदार संघटनेचे सरचिटणीस गांधी हेन्‍रीक यांनी पुरवठा खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांवर टीका केली आहे. रास्‍त धान्‍य दुकानदारांना सरकार ग्राह्य धरत आहे, ही बाब अयोग्‍य आहे. पुरवठा खात्‍याने खराब तांदूळ कुठ्ठाळी येथील गोदामातून बदलून न्‍यावा, असे म्‍हटले आहे. परंतु पोत्‍यांची ने-आण करायला कामगार, वाहन लागणार. त्‍याचा भार आम्‍ही का सोसावा?

वक्‍तव्‍याचा समाचार

काही दिवसांपूर्वी मंत्री रवी नाईक यांनी काही गोदामांना आकस्‍मिक भेट दिली होती. आम्‍ही स्‍वस्‍त दरात लोकांना ‘बिर्यानी राईस’ पुरवतो, असे ते मिश्किलपणे बोलले होते. खराब तांदूळ पुरवठा झाल्‍याच्‍या पार्श्वभूमीवर गांधी हेन्‍रीक यांनी रवी यांच्‍या वक्‍तव्‍याचा समाचार घेत सरकार धान्‍य दुकानदारांना ‘कव्‍वा बिर्यानी’ राईस देत आहे, असा टोला लगावला.

किती धान्‍य दुकानांना भेट दिली?

पुरवठा अधिकाऱ्यांनी धान्‍य साठा तपासला, असा दावा केला आहे. परंतु, किती धान्‍य दुकानांना भेट दिली, असा प्रश्‍‍नही संघटनेने उपस्‍थित केला आहे. अनेक दुकानांत निकृष्‍ट तांदूळ पुरवठा झाला आहे, असा त्‍यांचे म्‍हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT