Goa Drug Case  Dainik Gomantak
गोवा

कैद्यांसाठी जेलगार्डला केला कोकेन पुरवठा!

दोन दिवसांपूर्वी जेलगार्ड सूरज गावडे याला कारागृहाच्या गेटवर आरबीआयच्या पोलिसांनी कोकेनसह रंगेहाथ पकडले होते.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील अटक केलेल्या जेलगार्ड सूरज गावडे याला ड्रग्सचा पुरवठा करणारा ड्रग पेडलर योगेश पागी (24, काणकोण) याला कोलवाळ पोलिसांनी आगोंद-काणकोण येथून अटक केली.

दोन दिवसांपूर्वी जेलगार्ड सूरज गावडे याला कारागृहाच्या गेटवर आरबीआयच्या पोलिसांनी कोकेनसह रंगेहाथ पकडले होते. हे ड्रग्स गावडे याला संशयित योगेश पागी यानेच पुरवले होते, हे तपासावेळी समजल्यावर कोलवाळ पोलिसांनी योगेश पागी याला शुक्रवारी सायंकाळी उशिरा आगोंदमधून ताब्यात घेतले.

(Goa Drug Case)

हे ड्रग्स मूळ ठिकाणाहून कारागृहापर्यंत पोहचवण्यात आणखी काहीजणांचा समावेश असून, त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणानुसार कोलवाळ पोलिसांतर्फे उपनिरीक्षक कुणाल नाईक, हेड कॉन्स्टेबल सुधीर परब, कॉन्स्टेबल सुलेश नाईक, आयआरबीचे हेड कॉन्स्टेबल विशांत मांद्रेकर यांनी काणकोणमध्ये जाऊन ड्रग पेडलर योगेश पागी याला ताब्यात घेतले.

मोबाईलवरून योगेशशी संवाद

कोलवाळ कारागृहातील अंडर ट्रायल कैदी विकट भगत याने मोबाईलवरून ड्रग पेडलर संशयित योगेश पागी याच्याशी संपर्क साधला आणि जेलगार्ड सूरज गावडे याच्याकडे कोकेन (4 ग्रॅम) देण्यास सांगितले. त्यानुसार पागी याने तो जेलगार्डला पुरवला. भगतला मोबाईलही कसा मिळाला, हाही प्रश्‍न अनुत्तरित आहे. भगत याच्यावर काणकोण पोलिस स्थानकात एकूण 14 गुन्हे नोंद असून, यात खुनाचाही एक गुन्हा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT