Sunny Fernandes Curchorem suicide Dainik Gomantak
गोवा

नदीच्या पुलावर बसलेल्या तरुणाने अचानक मारली उडी, कुडचडेतील रहिवाशाचा शोध सुरू; कारण अस्पष्ट

Sunny Fernandes Curchorem suicide: सनी फर्नांडिस (वय ४० वर्षे) या तरुणाने शनिवारी दुपारी १२ वाजता सावर्डे येथील जुन्या झुआरी पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

केपे: मोरायले-कुडचडे येथील सनी फर्नांडिस (वय ४० वर्षे) या तरुणाने शनिवारी दुपारी १२ वाजता सावर्डे येथील जुन्या झुआरी पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला असून कुडचडे अग्निशामक दलाने शोध मोहीम हाती घेतली आहे.

शनिवारी दुपारी १२ वाजता सनी हा सावर्डे येथील जुन्या झुआरी पुलावर बसून असल्याचे काहीजणांनी पाहिले होते. सनीने अचानक नदीत उडी मारल्याचे यावेळी काही लोकांनी पाहिले आणि याची माहिती कुडचडे पोलिस तसेच अग्निशामक दलाला दिली. सनीचा शोध घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मोहीम सुरू होती.

वाचविण्यासाठी हात दाखविला पण...

सनी फर्नांडिस याने नदीत उडी मारल्यानंतर स्वत:ला वाचविण्यासाठी तो पाण्याबाहेर हात दाखवत होता, असे त्याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच कुडचडे पोलिस व अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध मोहिमेला सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT