पणजी: मडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने कोकण रेल्वे पोलिसांना २१ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान पोलिस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याच कालावधीत गोवा पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने पोलिस निरीक्षक सुनील गुडलर आणि हवालदार हुसेन यांना लाच घेताना अटक केली होती.
न्यायालयाकडून हा आदेश देण्यात आला, जेव्हा सध्या निलंबित असलेल्या गुडलर यांनी कोर्टात अर्ज दाखल करून दावा केला की, ते पोलिस स्थानकात नसून त्यावेळी रेल्वे स्टेशनवर गस्त घालत होते.
गुडलर यांचे वकील अॅड. गॅलिलिओ टेलीस यांनी सुनावणी दरम्यान सांगितले की, २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजून ८ मिनिटांनी गस्तीसाठी निघाल्याची नोंद गुडलर यांनी जनरल डायरीत केली होती, जी छाप्यापूर्वीची आहे.
गुडलर यांना गुरुवारी जामीन मंजूर झाला असून त्याआधी त्यांनी कोकण रेल्वे पोलिस स्थानकाच्या सार्वजनिक माहिती अधिकार अधिकाऱ्यांकडे २१ व २२ एप्रिलच्या स्थानक डायरी व जनरल डायरीच्या नोंदी तसेच स्टेशनच्या ग्राउंड फ्लोअर आणि बाहेरील भागातील २१ एप्रिल संध्याकाळी ६ वाजल्यापासून २२ एप्रिल दुपारी २ वाजेपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. त्यावर पोलिस उपअधीक्षक आणि माहिती अधिकाऱ्यांनी २९ एप्रिल रोजी उत्तर देताना हे फुटेज तपासात अडथळा येऊ शकतो, या कारणास्तव नाकारले.
ॲड. टेलीस यांनी याला उत्तर देताना सांगितले की, २१ एप्रिल रोजी गुडलर यांच्या उपस्थितीत जप्ती पंचनामा तयार करण्यात आला होता आणि त्याचे लिप्यंतरणही झाले आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिल्यास तपास अधिकारी अथवा तपास प्रक्रियेला कोणतीही बाधा येणार नाही.
त्यांनी यावर भर देऊन सांगितले की, “कोणत्याही पोलिस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज ही सार्वजनिक नोंद असते. विशेषतः या प्रकरणात अर्जदाराला चुकीच्या पद्धतीने अडचणीत आणण्यात आले आहे,” असा दावा करत गूड्लर यांना मडगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरून अटक करण्यात आल्याचे नमूद केले आणि नंतर त्यांना स्थानकात नेण्यात आले.
त्यांनी असेही सांगितले की, लाचलुचपत कार्यालय व स्थानकाच्या प्रवेश/निर्गमन दरवाज्यांवरील सीसीटीव्ही फुटेज व डायरी नोंदी या घटनेचा क्रम समजण्यासाठी आणि गुडलर यांना चुकीच्या पद्धतीने फसवले गेले नसल्याची खात्री करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.