Sunil Gudlar: गुडलरने लाच घेताना पोलिस ठाण्यातील CCTV होते बंद! ACBच्या चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती

Goa Police Bribery Case: कोकण रेल्वे पोलिस स्थानकातील निलंबित निरीक्षक सुनील गुडलर याने केलेली ही कृती सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारी असल्याची दखल विभागाने घेतली आहे.
Margao Railway Police Station Bribe Case
Sunil GudlarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बेळगावच्या मटण व्यापाऱ्याकडून २५ हजारांची खंडणी स्वीकारताना रेल्वे पोलिस स्थानक कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे जाणुनबुजून बंद केले होते, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या चौकशीत समोर आली आहे.

कोकण रेल्वे पोलिस स्थानकातील निलंबित निरीक्षक सुनील गुडलर याने केलेली ही कृती सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारी असल्याची दखल विभागाने घेतली आहे व त्याचा तांत्रिक अहवाल तज्ज्ञांकडून घेतला आहे, अशी माहिती सूत्राने दिली.

रेल्वेतून आलेले मांस कोकण रेल्वे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जप्त केले होते व ते बेळगावातील मटण व्यापाऱ्याने पाठवल्याचा दावा करून गुन्हा नोंद करण्याची धमकी तक्रारदाराला त्याने दिली होती. हा गुन्हा नोंद न करण्यास दरमहा २५ हजारांचा हप्ता (खंडणी) तसेच रोख २ लाख रुपयांचा पर्याय दिला होता.

Sunil Gudlar Arrest, Police Arrest
Sunil GudlarDainik Gomantak

तो खोटा आरोप करत असल्याने मटण व्यापाऱ्याने एसीबीकडे तक्रार दाखल करत त्याचे पुरेसे पुरावेही दिले होते. त्यानुसार त्याला सापळा रचून लाच घेताना अटक केली होती. यावेळी एसीबीने केलेल्या तपासणीवेळी लाच घेताना तेथील सीसी टीव्ही कॅमेरे बंद होते. हे कॅमेरे नादुरुस्त आहेत की लाच घेताना बंद ठेवण्यात आले होते यासंदर्भात तांत्रिक तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली.

Margao Railway Police Station Bribe Case
Konkan Railway Raid: मडगाव रेल्वे पोलिस स्थानकावर भ्रष्टाचार विरोधी पथकाचा सापळा; दोन अधिकारी अडकले जाळ्यात

या तपासणीत ते चालू स्थितीत असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. छापा टाकण्यापूर्वी त्या दिवसभरात सीसी टीव्ही कॅमेरे सुरू होते. मात्र, या कारवाईवेळी ते बंद होते. त्यामुळे या गुन्ह्याला अधिक बळकटी मिळत आहे, असे सूत्राने सांगितले.

Margao Railway Police Station Bribe Case
Sunil Gudlar Case: गुडलरवर यापूर्वीही गंभीर गुन्हे, चौकशीची गरज; ACB चा दावा, जामिनाच्‍या अर्जावर होणार निवाडा

यापूर्वी सुनील गुडलर याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्याविरुद्ध बेहिशेबीप्रकरणी एसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रावरील सुनावणी न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावेळी त्याच्या उत्पनाच्या स्रोतापेक्षा १६८ टक्के अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडली होती. ही चौकशी त्याच्याविरुद्धच्या ड्रग्ज प्रकरणात झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com