Sunburn Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Goa 2023: 31 रोजी सनबर्न नाही, तिकिटांचे पैसे परत; 28 पासून तीन दिवस महाेत्सव

Sunburn Goa 2023: सनबर्नमुळे मोठी वाहतूक कोंडी शक्य

दैनिक गोमन्तक

Sunburn Goa 2023: बहुचर्चित ‘सनबर्न’चे यंदा चार दिवस आयोजन करण्‍याचे घाटत होते. परंतु 31 डिसेंबरला महोत्‍सव होऊ नये, अशी जोरदार मागणी झाल्‍यानंतर सरकारनेही साजेशी भूमिका घेतली होती.

आता आयोजकही ‘बॅकफूट’वर गेले असून, 31 रोजी बूक केलेल्‍या तिकिटांचे पैसे परत केले जातील, अशी माहिती आयोजक हरिंदर सिंग यांनी दिली आहे.

हा महोत्‍सव 28, 29 व 20 डिसेंबरला होईल. शिवाय तो रात्री 10 पर्यंतच सुरू राहील. आयोजकांची रात्री 12 पर्यंत सनबर्न सुरू ठेवण्‍याची मागणी फेटाळण्‍यात आली आहे.

व्यवसाय, मनोरंजन यासारख्या गोष्टींवर मर्यादा हव्यात. सनबर्नच्या आयोजनातून हे प्रकार उघड होत असून तीन दिवसांसाठी सनबर्न ठीक आहे.

त्यामुळे 31 डिसेंबरला होणाऱ्या सनबर्नच्या आयोजनावर बंदी असावी, अशा शब्दांत हळदोणाचे आमदार अ‍ॅड.

कार्लुस फेरेरा यांनी थर्टी फस्टच्या संध्येला होणाऱ्या सनबर्न कार्यक्रमास विरोध केला. कारण, या दिवशी होणाऱ्या सनबर्नमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. सोमवारी ते माध्यमांसमोर बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

यापूर्वी सनबर्न 30 डिसेंबरपर्यंतच आयोजित केला जायचा. मात्र, यंदा आयोजकांनी आशा वाढली आहे. सध्या आयोजकांकडून 31 रोजीच्या कार्यक्रमाची जाहिरातबाजी व तिकीट विक्री सुरूच आहे.

हा त्यांचा प्रश्न असून सरकारकडून विशेषतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जुने गोवे फेस्ताच्या पार्श्वभूमीवर तसेच पर्यटनमंत्र्यांनी 31 रोजी सनबर्न होणार नसल्याचा दिलेला शब्द पाळण्याची गरज फेरेरा यांनी व्यक्त केली.

यापूर्वी एकदा असाच प्रकार घडलेला. एका मंत्र्यांनी आयोजकांसोबत अखेरच्या क्षणी डिल करून सनबर्नला परवानगी दिली होती. याप्रकारची पुर्नरावृत्ती आता होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

गैरसोय होईल!

31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येस गोव्यात लोकांची मोठी वर्दळ असते, याशिवाय स्थानिक लोक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्सुक असतात.

त्यामुळे ३१ रोजी सनबर्नचे आयोजन केल्यास लोकांना त्याचा प्रचंड त्रास व गैरसोय होऊन मोठी वाहतूक कोंडी होईल. तसेच, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT