Goa Crime News: अनुराग राजवतची दोन तास चौकशी

Goa Crime News: वास्‍को जळीतकांड : अग्निशमन जवानांचीही घेणार जबानी
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: शिवानी राजवत आणि जयदेवी चौहान यांच्‍या दुहेरी जळीत मृत्युप्रकरणी मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांनी हाती घेतलेली चौकशी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज त्यांनी शिवानीचा पती अनुराग राजवत याला पुन्हा बोलावून तब्बल दोन तास त्याची चौकशी केली. सदर दुर्घटना घडल्‍यावर तिथे आग विझविण्यासाठी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनाही करमली यांनी जबानी देण्यासाठी बोलावले आहे.

Goa Police
Goa Mining: अटींची पूर्तता न केल्‍यास कोर्टात जाणार; गोवा फाऊंडेशनचा इशारा...

शिवाय शेजाऱ्यांच्या जबान्याही ते नोंदवून घेणार आहेत. शिवानीचा भाऊ शुभम सिंह याने वास्‍को पोलिसांत तक्रार दाखल केल्‍यानंतर चौकशीला वेग आला आला आहे. नौदलात अधिकारी म्हणून काम करणारा आपला भावोजी अनुराग याने सुनियोजित कट रचून आपल्या बहिणीचा आणि आईचा खून केल्याचा आरोप त्याने केला आहे.

आपल्या बहिणीचा सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी छळ केला जात होता असेही त्याने तक्रारीत म्हटले आहे. यापूर्वी पोलिसांनी शिवानीची सासू साधना सिंह राजवत आणि नवऱ्याचा मावसा रामवरण सिंह यांच्‍या जबान्‍या नोंद करून घेतल्‍या आहेत.

Goa Police
New Zuari Bridge: नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या बाजूचे 22 डिसेंबरला उद्‌घाटन

दरम्‍यान, उपजिल्हाधिकाऱ्यांकडून येणाऱ्या अहवालाची आम्ही वाट पहात आहोत. त्यांचा अहवाल आल्यानंतर आम्ही गुन्हा नोंद करून घेण्याबाबत निर्णय घेऊ, असे या प्रकरणातील तपास अधिकारी पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी सांगितले.

जळालेला मोबाईल, जपमाळ पोलिसांच्‍या स्‍वाधीन

शिवानीचा भाऊ शुभम सिंह याने वास्‍को पोलिसांना घटनास्‍थळी सापडलेला एक जळालेला मोबाईल आणि आपल्‍या आईची जपमाळ पोलिसांच्‍या स्‍वाधीन केली आहे. हे जळीतकांड १८ नोव्‍हेंबर रोजी घडले होते. घरात झालेल्‍या गॅस सिलिंडरच्‍या स्‍फोटात शिवानी आणि तिच्‍या आईचा मृत्‍यू झाला होता. त्‍यावेळी त्‍यांच्‍याशिवाय घरात आणखी कोणी नव्‍हते. शिवानीचा पती अनुराग हा त्‍यावेळी बाहेर होता आणि स्‍फोटाचा आवाज ऐकल्‍यानंतर तो लगेच घरी परतला होता.

दूध तापवायला नव्‍हे, निरंजन पेटविण्‍यासाठी गेली अन्‌...

शुभम सिंह याने केलेल्‍या दाव्‍यानुसार, त्‍याची आई जयदेवी हिला देवाचे निरंजन पेटविताना जपमाळ हाती घेऊन जायची सवय होती. ज्‍याअर्थी घटनास्‍थळी जपमाळ सापडली त्‍याअर्थी आपली आई दूध तापवायला नव्‍हे, तर देवाला निरंजन पेटविण्‍यासाठी गेली असावी.

तिने निरंजन पेटविण्‍यासाठी माचिसची काडी पेटविली आणि त्‍याचवेळी घरात साचलेल्‍या गॅसमुळे स्‍फोट होऊन ती ठार झाली असावी असा संशय व्‍यक्‍त केला आहे. आपला भावोजी अनुराग यानेच मुद्दामहून गॅस सुरू ठेवून तो बाहेर गेला असावा. आपल्‍या आईला वाचविण्‍यासाठी आपली बहीण शिवानी बाथरूममधून बाहेर आल्‍यानंतर तीसुद्धा जळाली असावी असा संशय त्‍याने व्‍यक्‍त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com