Sunburn Festival 2023 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Goa 2023: सनबर्नची तारीख जाहीर, यावर्षी चार दिवस गोव्यात रंगणार महोत्सव

गोव्यात दरवर्षी होणारा सनबर्न संगीत महोत्सव अनेकांसाठी पर्वणी असते.

Pramod Yadav

Sunburn Goa 2023: गोव्यात दरवर्षी होणारा सनबर्न संगीत महोत्सव अनेकांसाठी पर्वणी असते. वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या या महोत्सवाला देश-विदेशातील अनेकजण हजेरी लावत असतात. कोरोना काळानंतर मागीलवर्षी झालेल्या सनबर्नला मोठी गर्दी झाली. पण, विविध कारणास्तव गेल्या वर्षीचा महोत्सव वादात सापडला.

दरम्यान, 2023 मध्ये होणाऱ्या सनबर्न महोत्वासाची तारीख जाहीर झाली असून, यावर्षी चार दिवस गोव्यात महोत्सव होणार आहे.

गोव्यातील वागातोर येथे 28 ते 31 डिसेंबर 2023 या काळात सनबर्नची 17 वी इडिशन होणार आहे. अशी अधिकृत घोषणा सनबर्नच्या वतीने करण्यात आली आहे. लोकांच्या मागणीमुळे यावर्षी हा महोत्सव चार दिवस होणार असल्याची माहिती समोर आलीय. 'एनचॅन्टेड फॉरेस्ट' अशी यावेळीच्या सनबर्नची थीम आहे.

यावर्षी चार दिवसात जवळपास तीन लाख प्रेक्षक या महोत्सवाला हजेरी लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 28 ते 31 या काळात 150 पेक्षा अधिक विविध सादरीकरण आणि शोचे आयोजन केले जाईल. याशिवाय राईड्स, आफ्टर पार्टी, अॅडव्हेंचर आणि विविध गेम्सचे आयोजन केले जाणार आहे.

मागील वर्षीचा सनबर्न सापडला वादात

कोरोना संकटानंतर 2022 मध्ये मोठ्या जल्लोषात सनबर्न पार पडला. त्याला मोठ्या संख्येने लोकांनी हजेरी लावली. दरम्यान, विविध कारणांनी महोत्सव वादात सापडला. महोत्सवाला दिलेली परवानगी आणि आवाज मर्यादा यावरून महोत्सवाबाबत वाद झाला. हा वाद न्यायालयात गेला.

सनबर्न महोत्सवासाठी प्रक्रिया नियमांचे उल्लंघन करून परवाने दिले आहेत. हे परवाने 24 तासांत म्हणजे, महोत्सव सुरू होणार असलेल्या दिवशीच दिले होते, असे मुख्य सचिवांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात नमूद केले होते.आयोजकांना संगीत वाजवण्यासंदर्भात दिलेल्या परवान्याचेही उल्लंघन केल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने उघड केल्याने त्यांची 10 लाखांची सुरक्षा ठेवही जप्त केली आहे.

तसेच, सुनावणी पूर्ण होईपर्यंत सरकारकडे असलेली 1.10 कोटींची सुरक्षा ठेव परत न करण्याचे निर्देश खंडपीठाने आज दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Employees Strike: शनिवारच्या सुट्टीसाठी बँक कर्मचाऱ्यांची आरपारची भूमिका; 40 मिनिटे अतिरिक्त कामाची तयारी, मात्र मागणी मान्य होईपर्यंत संप कायम

2027 च्या निवडणुकीत एकच ध्रुवीकरण हवे; '39-अ'चे समर्थक विरुद्ध '39-अ'चे विरोधक!

Lakshmi Narayanan Rajyog 2026: शुक्र-बुध युतीचा महाचमत्कार! लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावाने 'या' राशींवर होणार पैशाचा वर्षाव; संपत्तीत होणार बंपर वाढ

BSNL Tag Block Theft: 'बीएसएनएल'ला चोरांचा दणका, सासष्टीत टॅग ब्लॉकची चोरी; दूरध्वनी, इंटरनेट सेवा विस्कळीत

Goa Politics: फक्त निवडणुका आल्यावर यात्रा काढून उपयोग नाही! 'भाजप जनतेसोबत' म्हणत दामू नाईकांचा काँग्रेसला सणसणीत टोला

SCROLL FOR NEXT