MLA Vijay Sardesai Criticized Government Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival: 'दक्षिण गोव्यात सनबर्नचे आयोजन हे सरकारचे पिल्लू...'; सरदेसाईंचा सरकारवर हल्लाबोल

MLA Vijay Sardesai Criticized Government: आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर दक्षिण गोव्यातील या फेस्टिव्हलच्या आयोजनावरुन सरकारवर निशाणा साधला.

Manish Jadhav

Sunburn Festival: राज्यात सनबर्न फेस्टिव्हलवरुन राजकारण सुरु झाले आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन दक्षिण गोव्यातील या फेस्टिव्हलच्या आयोजनावरुन सरकारवर निशाणा साधला. दक्षिण गोव्यात सनबर्नचे आयोजन होणार हे सरकारने सोडलेले पिल्लू आहे, असे सरदेसाई म्हणाले. दक्षिणेत होणाऱ्या विरोधाचा दाखला देत भाजप सरकारला उत्तर गोव्यातच सनबर्नचे आयोजन करायचे असल्याचा दावा यावेळी सरदेसाई यांनी केला.

दरम्यान, या फेस्टिव्हलवरुन विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. अॅडव्होकेट राधाराव ग्रेसियस यांनीही सनबर्न फेस्टिव्हलवरुन सरकारवर सडकून टीका केली. ग्रेसियस म्हणाले की, सरकारने सनबर्न फेस्टिव्हल (Sunburn Festival) गुजरातला हलवावा, जिथे त्यांनी चांगला विकास केला आहे. मी सर्व पंचायती आणि नगरपालिकांना सनबर्न फेस्टिव्हलला विरोध करण्याचा ठराव पारित करण्याची विनंती करतो.

वर्षाअखेरीस दरवर्षी उत्तर गोव्यातील (North Goa) वागातोर येथे सनबर्नचे आयोजन केले जाते. यावर्षी मात्र याचे स्थान बदलून ते दक्षिणेत स्थलांतरीत करणार असल्याची घोषणा आयोजकांनी शुक्रवारी केली. या घोषनेनंतर गोव्यातील नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी याप्रकरणी तात्काळ प्रतिक्रिया देत उत्तर गोव्यात ड्रग, गुन्हे यांचे साम्राज्य निर्माण केल्यानंतर भाजप सरकारने आता दक्षिण गोव्यावर वक्रदृष्टी वळवली असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, कसल्याही परिस्थितीत दक्षिण गोव्यात सनबर्न होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेतून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: सत्तरीतील वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाचा भक्ती दंग

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

SCROLL FOR NEXT