Goa High Court on Sunburn Festival and Rider mania  Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival Goa: नियमांचे उल्लंघन झाल्यास उपकरणे जप्त करून कार्यक्रम बंद करा! कोर्टाचे आदेश

ध्वनिप्रदूषणाबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारीही दाखल केल्या आहेत

Kavya Powar

Sunburn Festival and Music Festivals in Goa: गोव्यात मोठ्या प्रमाणात इव्हेंट, विविध कार्यक्रम होत असतात. प्रामुख्याने डिसेंबर महिन्यात पर्यटकांची जास्त रेलचेल असते. 8 तसेच 9 डिसेंबरला गोव्यात इंडिया बाईक वीक सुरू आहे. तसेच शेवटच्या आठवड्यात सनबर्नचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर किनारी भागात मोठ्या आवाजात संगीत असते; ज्यामुळे स्थानिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.

डिसेंबरमध्येच ‘सनबर्न’पाठोपाठ आणखी किमान तीन ईडीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक होऊ घातले असून उत्तर गोव्याच्या किनारपट्टी भागात यावर्षी स्थानिकांची झोप अक्षरशः उडणार आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारीही दाखल केल्या आहेत. त्यामुळे आता खुद्द हायकोर्टाचीच याकडे विशेष नजर असणार आहे.

इव्हेंट्मध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास किंवा ध्वनिप्रदूषण झाल्यास कार्यक्रम बंद पाडण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. कार्यक्रमस्थळी असलेली उपकरणे जप्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

तसेच, नियम मोडणाऱ्यांवर थेट खटला चालवण्याचे आदेश आता कोर्टाने दिले आहेत. सोबतच या कार्यक्रमांमध्ये डेसिबल पातळीचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश सरकारी यंत्रणांना देण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT