Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival 2024 : ड्रग्सला प्रोत्साहन देणारे सनबर्न आम्हाला नको : कॅ. विरियातो फर्नांडिस

Sunburn Festival 2024 : विद्यालय परिसरात चॉकलेटच्या नावावर ड्रग्सचा पुरवठा

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को, गोव्याची संस्कृती, परंपरा टिकवून ठेवण्यासाठी अमलीपदार्थांना प्राधान्य देणाऱ्या सनर्बनला माझा विरोध असून आम्हाला हा उत्सव गोव्यात नको, असे दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.

गोव्याबरोबर दाबोळी चिखलीतील काही विद्यालयाच्या परिसरात विद्यार्थांना चॉकलेट व भेटवस्तू देण्याच्या उद्देशाने, चक्क अमलीपदार्थ देण्यात येत असल्याची खळबळजनक माहिती खासदार कॅ. फर्नांडिस यांनी दिली आहे. यात काही गृह विभागाचे धेंडे गुंतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दाबोळी-चिखली येथील ग्रामस्थांतर्फे

कॅ. फर्नांडिस यांचा गौरव चिखली पंचायतीच्या सभागृहात करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे खजिनदार ओरविल दौरादो, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष नियाजी शेख, इतर मागासवर्गीय समितीचे अध्यक्ष नितीन चोपडेकर, चिखली पंचायतीचे पंच फ्रान्सिस नुनीस, पंच रोमन वाझ, माजी सरपंच सेबेस्त्यांव परेरा, माजी सरपंच राहुल डिकोस्टा, माजी सरपंच प्रताप म्हार्दोळकर,

माजी उपसरपंच हेमंत फडते, दाबोळी काँग्रेस गटाध्यक्ष वसंत नाईक, काँग्रेसचे नेते ओलेसियो सिमॉईश, माजी पंच अनिता वाझ, रुई अरावजो, कुठ्ठाळी काँग्रेस गटाध्यक्ष पिटर डिसोझा, मुरगाव पालिकेचे नगरसेवक लिओ रॉड्रिगीस, माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ यादव, संजय म्हाळसेकर, तुळशिदास फळदेसाई, राजेश स्वामी, बोगमाळोचे माजी सरपंच लक्ष्मण कवळेकर, उर्मिला साळगावकर, सागर दुर्भाटकर उपस्थित होते.

‘दाबोळी’ बंद पडू देणार नाही’

माझ्या विरोधात सर्व सरकारी यंत्रणा काम करत होती, परंतु येथील जनता माझ्यासोबत राहिल्याने इंडिया आघाडीचा विजय झाला. दाबोळी विमानतळ कदापि बंद पडणार नाही. काही खासगी कंपन्या सरकारवर दबाव टाकून दाबोळीतील विमाने मोपावर वळवत आहेत आणि त्याला मंत्री, आमदारांचा पाठिंबा आहे.

कारण भाजप सरकारमधील काही मंत्र्यांनी पेडणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्यानेच दाबोळीवरील विमाने मोपावर वळविण्यात येत आहेत.

सनबर्नच्या नावाने ड्रग्सचा प्रसार

खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस म्हणाले, की गोव्यातील जनतेने आपली संस्कृती - परंपरा राखावी. अमलीपदार्थांना प्राधान्य देणारा उत्सव आम्हाला आमच्या मातृभूमीत नको. सनबर्नच्या नावाने गोव्यात ड्रग्सचा प्रसार करण्याचा हेतू आहे. याला आम्ही कदापि सहन करणार नाही. सनबर्न महोत्सव उत्तरेबरोबरच दक्षिणेतून हद्दपार करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT