Sunburn Festival 2024 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival: 'सनबर्न'बाबतीत गुप्त कारभार? दिल्लीत मात्र जोरदार जाहिरातबाजी

Goa Sunburn 2024: धारगळ येथे सनबर्न होऊ देण्यास विरोध होत असतानाच दिल्लीत मात्र सनबर्नचा कार्यक्रम खुलेआम जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीतील बहुतेक संकेतस्थळांवर ‘सनबर्नसाठी गोवा सज्ज’ अशा बातम्या दिल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Dhargalim Villagers Opposes Sunburn Festival 2024

पणजी: धारगळ येथे सनबर्न होऊ देण्यास विरोध होत असतानाच दिल्लीत मात्र सनबर्नचा कार्यक्रम खुलेआम जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीतील बहुतेक संकेतस्थळांवर ‘सनबर्नसाठी गोवा सज्ज’ अशा बातम्या दिल्या आहेत.

धारगळच काय, पेडणे तालुक्यात कुठेही सनबर्न होऊ देणार नाही, अशी भूमिका आमदार प्रवीण आर्लेकर यांनी घेतली आहे. तरीही त्यांचा विरोध मावळण्यात यश येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आजवर दरवर्षी सनबर्नला विरोध होत होता आणि नंतर तो विरोध मावळलाही जात होता. त्यामुळे यंदाही सनबर्नला होणारा विरोध मावळेल, असे याप्रकरणी मध्यस्थी करण्यात हातखंडा असलेल्यांचे म्हणणे असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे धारगळ येथे सनबर्न होणार, असे वृत्त दिल्लीतून प्रसारित झाले आहे.

‘खोये यहाँ’ महोत्सव गीत

सनबर्नसाठी ‘खोये यहाँ’ हे महोत्सव गीत कश्मीर आणि ओटीएट यांनी तयार केले आहे. या गाण्यात दिवाळीच्या उत्साहाचा, सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा आणि ईडीएम बीट्सचा अनोखा संगम आहे. सनबर्नसाठी ‘बुक माय शो’वर तिकीटविक्री सुरू असून एका दिवसाचे तिकीट ४ हजार रुपयांपासून सुरू होते, तर तीन दिवसांसाठी व्हीव्हीआयपी टेबल तिकीट १५ हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे, अशी माहिती संकेतस्थळांवर दिली आहे.

सरकारी यंत्रणेचे मौन

सनबर्नला सरकारी पातळीवर परवानगी दिलेली आहे की नाही, याविषयी सरकारी यंत्रणा मौन बाळगून आहे. धारगळच्या जागेची घोषणा झाल्यानंतरही तशी परवानगी दिलेली नाही, असे पर्यटन खात्याने म्हटलेले नाही. मोपा नियोजन व विकास प्राधिकरणाची परवानगी यासाठी लागणार आहे. त्यांच्याकडूनही याबाबतीत काहीच वक्तव्य झालेले नाही.

आजची बैठक निर्णायक

पेडणे तालुका नागरिक समितीने उद्या (ता. १५) पेडणे येथील भगवती हायस्कूलमध्ये बोलावलेल्या बैठकीत सनबर्नविषयी स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींचा पर्दाफाश केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: पिळगावचे शेतकरी एकवटले, वेदान्ता खाणीचा रस्ता अडवला; रस्त्यात उभारली झोपडी

IFFI Goa 2024: यंदाच्या इफ्फीत खास कार्यक्रमाचे आयोजन; 'इफ्फीएस्टा' करणार उपस्थितांचे मनरिजवण

Bhoma Flyover: गडकरीजी, देवी सातेरी आणि तिच्या भावाची ताटातूट थांबवा; गोव्यातल्या ग्रामस्थांची आर्त हाक

IFFI Goa 2024: आता तिकिटासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही, असं करा बुकिंग आणि चित्रपटांचा आनंद घ्या

Goa Today's News Live: IFFI च्या उद्घाटन समारंभाला सुरुवात, बॉलीवूडचे दिग्गज कलाकारांची हजेरी

SCROLL FOR NEXT