'Cash For Job' वरुन सत्ताधाऱ्यांत खदखद? नेते-कार्यकर्ते संभ्रमात; नेमकी 'भीती' कशाची?

Goa BJP: नोकऱ्यांच्या चोर बाजारावरून अखेर मंत्र्यांनी ताेंड उघडणे सुरू केले आहे. या प्रकरणांवरून राज्यात सत्ताधारी भाजपमध्ये मोठी खदखद दिसून येत आहे. उद्या आपले नाव कोणीतरी घेईल, अशी भीती अनेकांच्या मनात डोकावू लागली आहे.
Babush Monserrate, Ravi Naik, Sudin Dhavalikar
Babush Monserrate, Ravi Naik, Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

BJP Rift Widens Over Cash For Job Scam Allegations

पणजी: नोकऱ्यांच्या चोर बाजारावरून अखेर मंत्र्यांनी ताेंड उघडणे सुरू केले आहे. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी याप्रकरणी स्वतंत्र चौकशीची मागणी केल्याच्या काही तासांतच वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी या विषयावर मंत्रिमंडळात चर्चा होईल असे म्हटले आहे. तर कृषिमंत्री रवी नाईक यांनी याप्रकरणी कोणीही सुटणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.

नोकरी विक्री प्रकरणांवरून राज्यात सत्ताधारी भाजपमध्ये मोठी खदखद दिसून येत आहे. उद्या आपले नाव कोणीतरी घेईल, अशी भीती अनेकांच्या मनात डोकावू लागली आहे. यातूनच या प्रकरणी स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपमधूनच होत असून महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी या विषयाला तोंड फोडले आहे. राज्यभरात याप्रकरणी अटक होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

होतकरू युवकांवर अन्याय; सुदिन ढवळीकर

सध्या राज्यातील ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरण पाहिले तर राजकारण्यांना लाज वाटण्यासारखी स्थिती असून या प्रकाराची सखोल चौकशी व्हायला हवी, असे मत मगोपचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले. एखाद्या गरीब कुटुंबातील माता-पिता मुलांना कठीण परिस्थितीतून शिकवतात, मोठे करतात; पण पैसे घेऊन नोकरी देण्याच्या प्रकारामुळे अशा गुणी आणि होतकरू युवकांवर अन्याय होतो, म्हणून अशा प्रकारांची सखोल चौकशी व्हावी, असे सांगतानाच मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय नक्कीच येईल. त्यानंतरच यावर अधिक भाष्य करू, असे ढवळीकर म्हणाले.

दोषींवर कारवाई होणारच : कृषिमंत्री

कृषिमंत्री रवी नाईक यांना ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाविषयी विचारले असता ते म्हणाले की, या प्रकरणांचा तपास योग्य दिशेने सुरू असून पोलिस आवश्‍यक ती माहिती गोळा करीत आहेत. दोषींवर कारवाई होणारच आहे. त्यासंंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे ‘गॉडफादर’, ‘गॉडमदर’ सर्वांवर कारवाई होईल, असे रवी नाईक यांनी सांगितले.

Babush Monserrate, Ravi Naik, Sudin Dhavalikar
Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

नेते-कार्यकर्ते संभ्रमात

दररोज नवनवी प्रकरणे समोर येऊ लागल्याने नेते-कार्यकर्तेही संभ्रमित झाले आहेत. शिस्तबद्ध म्हणविल्या जाणाऱ्या पक्षाचे सरकार असताना असे प्रकार कसे घडत होते, असा धक्का कार्यकर्त्यांना बसला आहे. त्यातच या प्रकरणात पक्षाचा कोणी पदाधिकारी-मंत्री गुंतलेला नाही, असे सांगण्याचे धाडस कोणीच केले नसल्याने सर्वजण बुचकळ्यात पडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com