Sunburn Festival in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Sunburn: सनबर्नच्या 100 कोटी मानहानीच्या दाव्यावर पार पडली सुनावणी; काय म्हणाले कोर्ट वाचा

Goa Sunburn: या अर्जावरील पुढील सुनावणीपर्यंत सनबर्नसंदर्भात आरोप करण्यास प्रतिवाद्यांना लगाम बसला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Sunburn

पणजी: गोव्यात सनबर्न ईडीएम महोत्सवावेळी अमलीपदार्थांचा व्यवहार होत असल्याची बदनामी करण्यात आल्याने स्पेसबाऊंड वेब लॅब्स प्रा. लि. कंपनीने सादर केलेल्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्यावरील सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देताना प्रतिवाद्यांना कोणत्याही प्रकारची बदनामी करण्याची वक्तव्ये करण्यास तात्पुरता प्रतिबंध घातला आहे.

तसेच या अर्जावरील सुनावणी २४ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली. त्यामुळे या अर्जावरील पुढील सुनावणीपर्यंत सनबर्नसंदर्भात आरोप करण्यास प्रतिवाद्यांना लगाम बसला आहे.

सनबर्न ईडीएम महोत्सव आयोजक कंपनीने दाखल केलेल्या मानहानीच्या अर्जात दक्षिण गोवा खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस, 'आप'चे आमदार वेन्झी व्हिएगस, आमदार क्रुझ सिल्वा, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, क्लियोफातो कुतिन्हो, छाया गाड, 'गोंयचे फुडले पिळगे खातीर' तसेच काही प्रसार माध्यमांना प्रतिवादी केले आहे.

न्यायालयात हा अर्ज प्रलंबित असतानाही बदनामी करण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे अंतरिम आदेश द्यावा, अशी विनंती अर्जदाराचे वकील तांबोळी यांनी केली. प्रतिवाद्यांना नोटीस बजावूनही ते उपस्थित राहिले नाहीत व त्यांनी स्पष्टीकरणही केलेले नाही.

त्यांनी केलेल्या वक्तव्याचा इन्कार केलेला नाही. त्यामुळे अर्जदाराच्या वकिलांनी उपस्थित केलेल्या मुद्यांमध्ये सध्या तथ्य असल्याने अंतरिम आदेश देण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT