Sumita Sawant cancer survival story Dainik Gomantak
गोवा

World Cancer Day: स्टेज तीनचा कॅन्सर असल्याचे समजले आणि पायाखालची वाळू सरकली; इच्छाशक्तीने कर्करोगावर केली मात

Cancer survival story: गोमेकॉतील उपचार प्रक्रियेचा अनुभव आल्यानंतर गोमंतकीय असल्याचा अभिमान वाटतो असे सुमिता सावंत यांनी सांगितले.

Sameer Panditrao

प्रसाद सावंत

तिसवाडी: कर्करोग असल्याची पुष्टी जेव्हा झाली तेव्हा हादरून गेले होते; परंतु घरच्या मंडळींनी दिलेल्या पाठिंब्याने लढण्याची ऊर्जा निर्माण झाली. त्यात दृढनिश्चय आणि इच्छाशक्तीने कर्करोगावर मात केली, अशी आपली संघर्षगाथा धोंडेभाट-नेवरा येथील सुमिता विनायक सावंत यांनी व्यक्त केली.

जून २०२३ मध्ये आंघोळ करताना काखेत गाठ झाल्याची शंका आली. याची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी डॉक्टरकडे तपासण्याचा सल्ला दिला. चिकित्सा केल्यानंतर चाचणी करण्याची सूचना डॉक्टरनी केली. गोमेकॉत जाऊन चाचणी केल्यानंतर जुलै २०२३ मध्ये स्तनाचा कर्करोग झाल्याची पुष्टी झाली.

त्यात स्टेज तीनचा कर्करोग झाल्याने लगेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टर्सनी घेतला; परंतु मधुमेह आणि रक्तदाबामुळे थोडा विलंब झाला, अखेर ऑगस्टमध्ये शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर किमान पाच महिने जखम भरण्यात गेले. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये केमोथेरपी उपचार सुरू झाला. तेव्हा माझी थोरली सून नव्या सावंत हिने मला कठीण काळात धीर आणि आधार दिला.

ती माझ्यासोबत चाचणीला यायची, तसेच माझी मुलगी रूपा हळर्णकर हिनेदेखील माझी साथ सोडली नाही. त्याशिवाय धाकटी सून ओजस्वी सावंत, ज्येष्ठ माझा मुलगा ज्ञानेश आणि माझे पती विनायक सावंत यांनी धीर दिला. त्याचबरोबर नातेवाईक आणि शेजाऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे लढा देण्याचा निश्चय आणखी दृढ झाला, अशी माहिती सुमिता सावंत यांनी दिली.

या काळात केवळ इच्छाशक्ती आणि देवावर श्रद्धा ठेवून कॅन्सरशी लढा दिला. हा काळ कठीण होता; परंतु गोमेकॉत डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मदतीचा हात आणि देवाची कृपा यामुळे नोव्हेंबर २०२४ मध्ये उपचार थांबवण्यात आले. अखेर डॉक्टर्सनी मला कर्करोगमुक्त झाल्याची माहिती दिली. हा जणू चमत्कारच होता; कारण स्टेज तीनवर असलेले रुग्ण वाचण्याची शक्यता कमीच असते.

गोमंतकीय असल्याचा अभिमान

आता कर्करोग बरा झाला असला तरी पुन्हा येण्याची शक्यता असते, त्यासाठी मनाची तयारी केली आहे. लढण्याची तयारी असून डॉक्टर्सनी दिलेल्या सूचना आणि पथ्यांचे पालन करणार आहे. काळजी म्हणून काही चाचण्या नियमितपणे कराव्या लागतील. गोमेकॉतील उपचार प्रक्रियेचा अनुभव आल्यानंतर गोमंतकीय असल्याचा अभिमान वाटतो. ज्यांना कर्करोग असेल त्यांनी घाबरून जाऊ नये आणि उपचारासाठी गोमेकॉत यावे. इतर राज्यांतील परप्रांतीय येथे उपचार घेतात, यासाठी गोमंतकीयांनी येथे येऊन विश्वास ठेवून उपचार घेतला पाहिजे; कारण येथे येणारे रुग्ण बरे होतात, असे सुमिता सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT