Suleman Khan Escape  Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan Case: केरळमध्येही 'सुलेमान'चा प्रताप! पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्न; Viral Video बाबत चौकशी सुरु

Suleman Khan Arrest: केरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीकी हा १९ डिसेंबर रोजी कोचीमध्ये दाखल झाला तेव्हा गोवा पोलिसांनी केरळ पोलिसांकडे मदत मागितली.

गोमन्तक डिजिटल टीम

Suleman Khan Arrest Kerala Police Custody

पणजी: सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खानच्‍या मुसक्‍या केरळमधील कलमशेरीत आवळण्‍यात आल्‍यानंतर त्‍याने आपल्या शैलीत पोलिसांना लाच (पैसे) देण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र केरळ पोलिसांनी तो धुडकावल्यामुळेच सिद्दीकी गोवा पोलिसांच्या हाती लागला, अशी माहिती त्रिक्काकराचे साहाय्‍यक पोलिस आयुक्त पी. व्ही. बेबी यांनी दिली.त्यांच्याकडे सिद्दीकीवर नजर ठेवण्याची जबाबदारी कोचीचे पोलिस आयुक्त विक्रमादित्य यांनी दिली होती.

केरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीकी हा १९ डिसेंबर रोजी कोचीमध्ये दाखल झाला तेव्हा गोवा पोलिसांनी केरळ पोलिसांकडे मदत मागितली. कोची शहर पोलिस आयुक्तांना याची माहिती पोलिस महासंचालनालयातून देण्‍यात आली. त्यानंतर सिद्दीकीचा शोध केरळ पोलिसांनी सुरू केला. २० रोजी तो कलमशेरीतील एका व्हिलामध्ये लपून बसल्याचे समजले. या मोहिमेची जबाबदारी बेबी यांच्‍याकडे देण्यात आली. सिद्दीकी हा एक गंभीर गुन्हेगार असल्याचे कळविले गेले नव्हते, त्याच्यावर फक्त नजर ठेवण्याचे आदेश होते.

पोलिसांची हालचाल लक्षात येताच सिद्दीकी शनिवारी रात्री पत्नी व मुलांसह कारने पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याचवेळी त्याला पकडण्यात आले. गोवा पोलिसांशी संवाद साधल्यानंतरच सिद्दीकीच्या गुन्हेगारी इतिहासाची केरळ पोलिसांना माहिती मिळाली. पकडले गेल्यावर सिद्दीकीने पोलिसांसमोर नेहमीप्रमाणे पैसे देण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र पोलिसांनी तो फेटाळला. उलट खबरदारी म्हणून अटक करून त्‍याला विशेष तपास पथकाकडे सुपूर्द करण्यात आले.

सिद्दीकीसह त्याच्या पत्नीला देखील जमीन बळकावण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली. रविवारी कोचीमध्ये विशेष तपास पथकाकडे दोघांनाही सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर तेथून गोवा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

असा जाळ्यात सापडला सिद्दीकी

सिद्दीकीने पळून जाण्यासाठी होंडा सिटी कारचा वापर केला. या कारला जीपीएस प्रणाली बसवली होती. त्याची कल्पना सिद्दीकीला नव्हती. त्याने हुबळीतून बाहेर पडताना ही कार वापरल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने त्याच्‍या पुढील हालचाली समजणे पोलिसांना सोपे गेले. या कारच्या जीपीएस प्रणालीचा माग काढून तो कोचीमध्ये असल्याचे समजले. ती माहिती पोलिसांना मिळेपर्यंत तो कलमशेरी येथे पसार झाला होता.

सात दिवसांची पोलिस कोठडी

जमीन हडप प्रकरणातील संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली आहे. कोठडीतून पलायन करण्यास मदत करणारा बडतर्फ पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याला त्‍याने काय ऑफर दिली होती, तसेच त्याने पलायन काळात काढलेले दोन व्हिडिओ व त्यातील सत्यता, याची चौकशी जुने गोवे पोलिसांनी सुरू केली आहे.

अमित नाईक याने चौकशीवेळी संशयित सिद्दीकीने आपल्‍याला ३ कोटींची ऑफर दिल्याची कबुली दिली होती. तसेच सिद्दीकी काढलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्येही म्‍हटले आहे. परंतु हुबळी येथे पोहोचल्यावर पैसे न देता त्‍याची फसवणूक केली, असेही त्‍याने म्‍हटले आहे. सिद्दीकीने आपल्‍या दोन्ही व्हिडिओंमध्ये परस्परविरोधी विधाने केलेली आहेत. त्यामुळे त्याने ते व्‍हिडिओ स्वतः काढले की त्यामागे बोलविता धनी कोण वेगळा आहे, याचा तपास पोलिस घेत आहेत.

दरम्‍यान, पलायन केलेल्या दहा दिवसांच्या काळात सिद्दीकीने आठवेळा ठिकाणे बदलली आहेत. त्यामुळे तो कोणाकडे वास्तव्य करून होता, याचीही चौकशी केली जात आहे.

पत्‍नी अफसानाला ४ दिवसांची पोलिस कोठडी

म्हापसा येथील जमीन हडप प्रकरणात सिद्दीकीची पत्‍नी अफसाना ऊर्फ सारिका खान हिला म्हापसा न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. एसआयटीमार्फत तिची चौकशी सुरू आहे. पती सिद्दीकीला बोगस दस्तऐवज तयार करत जमिनी हडप करण्याच्या प्रकरणात तिने सहकार्य केले आहे व तिच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्‍यात आला आहे. तिने सिद्दीकी याला पलायन काळात लपण्यास सहकार्य केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. एसआयटी चौकशी पूर्ण झाल्यानंतर तिला जुने गोवे पोलिस चौकशीसाठी आपल्‍या ताब्यात घेतील, अशी माहिती पोलिससूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT