Suleman Khan Video Viral Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan Video: सुलेमान पलटला; म्हणाला, पालेकरांच्या सांगण्यावरून पोलिसांवर आरोप

Suleman Khan About Amit Palekar: सुलेमान खान याचा दुसरा व्हिडिओ आज समोर आला आहे, त्यामध्ये आमदार व पोलिसांवर जे आरोप केले आहेत ते ‘आप’चे गोव्यातील निमंत्रक ॲड. अमित पालेकर यांच्या सांगण्यावरून केल्याचा पर्दाफाश केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Suleman Khan Viral Video

पणजी: दहा दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचच्या कोठडीतून पलायन केलेल्या जमीन हडप प्रकरणातील मास्टरमाईंड संशयित सुलेमान महंमद खान ऊर्फ सिद्दीकी व त्याची पत्नी अफसाना ऊर्फ सारिका खान या दोघांच्या एर्नाकुलम, केरळमधून एका घरातून दोन दिवसांपूर्वीच पोलिस पथकाने मुसक्या आवळल्या होत्या. केरळ पोलिसांकडून हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गोवा पोलिसांनी आज संध्याकाळी त्यांना गोव्यात आणले.

सुलेमान महंमद खान ऊर्फ सिद्दीकी याचा दुसरा व्हिडिओ आज समोर आला आहे, त्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये एक आमदार व पोलिसांवर जे आरोप केले आहेत ते ‘आप’चे गोव्यातील निमंत्रक ॲड. अमित पालेकर यांच्या सांगण्यावरून केल्याचा पर्दाफाश केला आहे. त्यामुळे पालेकर हे अडचणीत आले आहेत. संशयित सुलेमान महंमद खान ऊर्फ सिद्दीकी याला पोलिसांनी केरळमध्ये दोन दिवसांपूर्वीच अटक केल्याची माहिती सकाळी मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना दिली व विरोधकांवर सडकून टीका केली.

सुलेमान महंमद खान ऊर्फ सिद्दीकी याने नवा व्हिडिओ आज जारी केला आहे. त्‍यात तो म्‍हणतो, क्राईम ब्रँच पोलिस कोठडीत असताना बडतर्फ पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याच्याशी मी मैत्री केली.

मला जामीन मिळण्याची शक्यता नसल्याने त्याला मदत करण्यास सांगितले. त्यासाठी मी त्याला पैसे देण्याचे आमिष दाखवले. त्याने मला हुबळीपर्यंत पोहोचवले. मात्र, हुबळीला पोहोचल्यावर त्याला पैसे न देता त्याची फसवणूक केली.

मी फरार झाल्यानंतर ॲड. अमित पालेकर याच्याशी संपर्क साधला व जामिनासाठी अर्ज करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी त्यासाठी मला सत्ताधारी राजकारण्यांची तसेच काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नावे घेऊन व्हिडिओ करण्यास सांगितले होते.

त्यानुसार मी तो व्हिडिओ करून पाठवला. त्याने जामिनासाठी माझ्यावतीने न्यायालयात अर्ज केला होता. जामिनासाठी हा व्हिडिओ पाठवला होता. मात्र, त्याने मी पाठविलेल्या व्हिडिओमध्ये हवे तसे बदल (एडीट) करून तो समाज माध्यमांसमोर उघड केला व त्याचा गैरवापर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT