Goa Forward Party Dainik Gomantak
गोवा

Goa Forward Party: सुलक्षणा सावंत यांनी अभ्‍यास करूनच बोलावे किंवा तोंड बंद ठेवावे : सय्‍यद

सुलक्षणा सावंत यांनी केंद्र सरकारने केलेल्या वक्तव्‍याचा आम्‍ही निषेध करतो,

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Forward Party: आंतरराष्ट्रीय महिलादिनीच भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुलक्षणा सावंत यांनी केंद्र सरकारने केलेल्या गॅस सिलिंडर दरवाढीचे समर्थन केले

. त्‍यांच्‍या वक्तव्‍याचा आम्‍ही निषेध करतो, असे गोवा फॉरवर्डच्‍या उपाध्यक्ष अॅड. अश्‍मा सय्यद यानी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. सावंत यांनी अभ्यास करूनच बोलावे किंवा तोंड तरी बंद ठेवावे, असा सल्लाही त्‍यांनी दिला.

आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्यामुळे केंद्र सरकारला गॅसदरवाढ करणे भाग पडले असे सावंत सांगतात. पण सप्टेंबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचा दर 9 डॉलर होता. या मार्चमध्ये तो 3 डॉलरवर आला आहे.

किंमत कमी झालेली असताना केंद्र सरकार दरवाढ असे काय करू शकते? साखळी येथे लोक आता स्‍वयंपाक बनविण्‍यासाठी गॅसऐवजी चुलीचा वापर करू लागले आहेत. हे कशाचे द्योतक आहे?, असा सवालही त्‍यांनी विचारला.

आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रुड तेलाच्या दरात वाढ झाली असेल तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत कसे काय खासगी विमानाने प्रवास करतात? वाढत्‍या महागाईवर सरकारने तोडगा काढणे आवश्यक आहे, अन्‍यथा एक दिवस जनता रस्‍त्‍यावर उतरल्‍याशिवाय राहणार नाही, असा इशारा नगरसेविका निमेसिया फालेरो यांनी दिला.

दरम्‍यान, या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका पूजा नाईक यांचीही उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT