AAP leader Sanjay Singh controversy Dainik Gomantak
गोवा

Sulakshana Sawant: 'मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची बदनामी करणं थांबवा'! कोर्टाने घातला लगाम; संजय सिंह यांना मोठा धक्का

Sulakshana sawant Defamation Case: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्या विरोधात वक्तव्य करण्यास दिल्लीचे खासदार आणि आप नेते संजय सिंह यांना न्यायालयाने मज्जाव केला

Akshata Chhatre

डिचोली: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्या विरोधात वक्तव्य करण्यास दिल्लीचे खासदार आणि आप नेते संजय सिंह यांना न्यायालयाने मज्जाव केला आहे. याप्रकरणी डिचोलीच्या दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यासंदर्भात न्यायालयाने सोमवार (दि.२९) रोजी हा आदेश दिला आहे.

१०० कोटींच्या मानहानीचा खटला

४ डिसेंबर रोजी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार संजय सिंह यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांचे नाव ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याशी जोडले होते. या घोटाळ्यात सुलक्षणा सावंत यांचाही हात असल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला होता.

यानंतर सुलक्षणा सावंत यांनी आपली बदनामी केल्याचा दावा करत संजय सिंह यांच्या विरोधात डिचोलीच्या दिवाणी न्यायालयात १०० कोटी रुपयांची मानहानीची याचिका दाखल केली होती.

न्यायालयाचा कठोर आदेश

या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान खासदार संजय सिंह यांनी आपले उत्तर सादर करण्यास न्यायालयाकडून वेळ मागितला होता. त्यानंतर २५ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना ७ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते.

या ताज्या आदेशामुळे संजय सिंह यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. न्यायालयाने आता त्यांना सुलक्षणा सावंत यांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य करण्यास मनाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Sadetod Nayak: डाग नसलेले उमेदवार काँग्रेसने देणे गरजेचे, त्यांनी विश्वासार्हता गमावली; भाजप निश्चितपणे पुन्हा जिंकेल

ओळखणंही झालं कठीण! WWE दिग्गज John Cenaचा धक्कादायक लूक; फोटो पाहून चाहतेही अवाक्!

Ardh Kendra Yog 2026: बँक बॅलन्स वाढणार, सगळ्या चिंता मिटणार! 'अर्धकेंद्र योग' बदलणार 5 राशींचे भाग्य; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT