Sonali Phogat Death  Dainik Gomantak
गोवा

गुंगीचे औषध पाजत फोगाट यांचा स्वीय सहायकानेच केला घात

मालमत्ता हडप आणि राजकीय करिअर संपवण्याच्या इराद्याने केला सोनालीचा खून

दैनिक गोमन्तक

Sonali Phogat murder case: मागील तीन ते चार दिवस सोनाली फोगाटच्या हत्याप्रकरणाने गोव्यातील वातावरण चांगलच तंग झाले आहे. सोनालीच्या नातेवाईकांनी केलेले आरोप. राजकिय आरोप - प्रत्यारोप यामुळे या प्रकरणाकडे गोव्यासह संपुर्ण देशाचे लक्ष लागले होते. या प्रकरणात आता आणखी एक खुलासा बाहेर आला आहे.

(Sukhwinder Singh & Sudhir Sangwan confessed Sonali Phogats murder )

सोनाली फोगटच्या हत्येप्रकरणी हणजूण पोलिसांनी खुलासा करताना म्हटले आहे की, फोगट यांचा स्वीय सहायक सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग पाल यांना आता या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपीने हणजूण येथील रेस्टॉरंटमधील पिण्याच्या पाण्यात विषारी पदार्थ मिसळल्याची कबुली दिली आहे. यातच फोगट यांना अस्वस्थ वाटू लागले व यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपीने हे कृत्य का केले याबाबत खुलासा करताना संशयित आरोपींनी सोनाली फोगटची मालमत्ता, आर्थिक संपत्ती हडपणे तसेच तिची राजकीय कारकीर्द संपवण्याच्या उद्देशाने दोघांनी तिची हत्या केली असल्याची माहिती यावेळी पोलीसांनी दिली आहे.

याबाबत बोलताना हणजूण पोलिसांनी सांगतले की, फोगट ह्या अस्वस्थ असताना ज्या वाहनातून रुग्णालयात घेऊन गेले त्या वाहन चालकांची चौकशी केली जाणार आहे. तसेच काही लोक मुंबईवरुन यांच्याकडे येणार होती याची ही माहिती समोर आली आहे. त्यांची ही कसून चौकशी केली जाणार अशी माहिती यावेळी पोलीसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT