Goa Court
Goa CourtDainik Gomantak

Goa Court: गोवा खंडपीठाने मालमत्ता लिलाव स्थगिती फेटाळली

याचिकादाराला 15 हजारांचा दंड
Published on

पणजी: दिवाणी न्यायालयाने वेळोवेळी मालमत्तेच्या लिलावासाठी उपस्थित राहण्याची तसेच लिलावास उपस्थिती लावण्याची मान्यता देऊनही याचिकादार मारियान परेरा यांनी ऐनवेळी लिलावाच्या दिवशी त्याच्या स्थगितीसाठी सादर केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळली. तसेच याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी गोवा खंडपीठाचे कामकाज थांबवावे लागले असे निरीक्षण नोंदवत याचिकादाराला 15 हजाराचा दंडही ठोठावला. (Goa bench rejects stay on property auction)

 Goa Court
Goa News: कला अकादमी, ओडीपी-पीडीए प्रकरण दबावामुळे बंद

याचिकादाराच्या कुटुंबातील प्रमुखाने मालमत्तेच्या लिलावासाठी अर्ज सादर केला होता. त्यावरील सुनावणी 26 जुलै रोजी ठेवण्यात आली होती. या दिवशी लिलावाशी संबंधित असलेल्यांना नोटीस पाठवून ती पुढे ढकलण्यात आली होती. काही कारणास्तव आपले वकील उपस्थित राहू शकत नसल्याचे याचिकादाराने न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर लिलाव 22 ऑगस्टला ठेवण्यात आल्याचे याचिकादाराच्‍या वकिलांनी याचिकादाराला सांगितले. त्यामुळे याचिकादाराने कुटुंब प्रमुखाच्या वकिलाशी संपर्क साधून या तारखेला शक्य नसल्‍याने तहकूब करण्यासाठी अर्ज सादर करणार असल्याचे सूचित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com