Suicide of married woman by jumping into pond  Dainik Gomantak
गोवा

तळ्यात उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता

दैनिक गोमन्तक

सासष्टी: कुडतरी येथील रायतळ्यात उडी घेऊन फातिमा बी शेख (22, चांदर) या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी उघडकीस आली. याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. काल संध्याकाळी या महिलेने तळ्यात उडी घेतली.

उडी घेताच तळ्याजवळील लोकांनी लगेच अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यांनी लगेच येऊन महिलेला पाण्यातून वर काढले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी या महिलेचा मृतदेह जिल्हा इस्पितळातील शवाघरात ठेवला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

राशोल येथे एका 18 वर्षीय विद्यार्थिनीने घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल संध्याकाळी सातच्‍यादरम्‍यान घडली. तिच्‍या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरण नोंद केले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT