Sugarcane fires at Morjim
Sugarcane fires at Morjim Dainik Gomantak
गोवा

नागझर येथे ऊसाला आग शेती खाक; लाखोंची हानी

दैनिक गोमन्तक

मोरजी : नागझर-पेडणे येथे ऊसाच्या मळ्याला आज शनिवारी दुपारी लागलेल्‍या आगीत सुमारे 22 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक दल पोचण्यापूर्वीच शेती पूर्णपणे जळून गेली. नागझर परिसरात तिळारी नदी कालव्याच्या बाजूला अनेक शेतकऱ्यांनी ऊस, केळी, मिरची आदींची शेती केली होती.

आज दुपारी अचानक या शेतीच्या मळ्यांना आग (fire) लागली. त्‍यात सर्व शेती नष्ट झाली. शेतकरी आपल्या घरी जेवायला गेल्यानंतर अचानक आग लागल्याने ती विझवण्यासाठी कोणीच नव्हते. शेतकऱ्यांना जेव्हा माहिती कळली तेव्‍हा त्‍यांनी तात्‍काळ घटनास्‍थळी धाव घेतली, पण काही उपयोग झाला नाही.

पूर्णपणे जळून गेलेली शेतीच त्‍यांच्‍या नजरेस पडली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्‍यामुळे शेतकरी हतबल झाले. कोणीच प्रतिक्रिया द्यायच्‍या मन:स्थितीत नव्हता.
शेतीला (Agriculture) संरक्षण मिळावे म्हणून सरकारमार्फत (Government) योजनेअंतर्गत तारेचे कुंपण घालण्‍यात आले होते. तरीही दुर्घटना घडलीच. परिणामी 22 शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. गतसाली अशीच आग लागून नुकसानी झाली होती. मात्र सरकारकडून अजूनपर्यंत काहीच नुकसानी मिळालेली नाही.

जमिनी गेल्या, आता उत्पन्नही गेले!

नागझर येथील या शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्‍पांसाठी मोठ्या प्रमाणात गेल्‍या आहेत. त्‍यात मोपा विमानतळ आणि लिंक रोड प्रामुख्‍याने सामावेश होतो. रहिलेल्‍या जमिनींत शेतकऱ्यांनी शेती केली होती. तेच उत्पन्न आता आगीने खाक झाल्‍याने या शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. एकामागोमाग एक येणाऱ्या संकटाचा सामना कसा करावा, या विवंचनेत शेतकरी आहेत. सरकारने आपल्‍याला ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Panaji News : बाबूशला पंच रबरस्टँप म्हणून हवेत; सिसील-फ्रान्सिस यांचा आरोप

Loksabha Election 2024 : मडकईतून ९० टक्के मतदानासाठी प्रयत्न भर! सुदिन ढवळीकर

Goa Today's Live Update: लोकसभा निवडणूक! गोवा पोलिसांकडून तपासणी नाक्यावर वाहनांची कसून तपासणी

India Foreign Exchange Reserves: 23 हजार कोटींचा फटका; सलग दुसऱ्या आठवड्यात देशाच्या परकीय गंगाजळीत घट

Goa Demand High Court: गोव्यात स्वतंत्र उच्च न्यायालयाची मागणी; बार असोसिएशनचा ठराव

SCROLL FOR NEXT